वादळे येतात आणि जातात, चिंता करु नका : आमदार औटी

वादळे येतात आणि जातात, चिंता करु नका : आमदार औटी

टाकळी ढोकेश्वर (नगर) : कुठल्याही राजकिय पक्षाच्या कारकिर्दीत अनेक वादळे येतात आणि जातात. कोण गेले कोण आले, याची चिंता करू नका. माझा शिवसैनिक जागेवरच आहे आणि तो या विधानसभेच्यावेळी तो दाखवून देणार आहे, असे प्रतिपादन आमदार विजय औटी यांनी केले.

हिवरे कोरडा (ता.पारनेर) येथे शिवसेना शाखेचे उद्‌घाटन औटी यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. औटी म्हणाले,आपल्या पाठीमागे बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत. आपला मतदारसंघ हा इतिहास घडविणारा मतदारसंघ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पारनेर तालुक्‍याची नवीन ओळख करून देण्याचे काम आपण पंधरा वर्षात केले आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहकले, पोपट चौधरी, संदीप कोरडे, गणेश कोरडे,अमोल अडसूळ, बाळासाहेब अडसुळ, अमोल कोरडे, गणेश कोरडे उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com