MLA Vaibhav Pichad About Sharad Pawar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू
राष्ट्रवादीने वेळ वाढवून मागितल्याची सूत्रांची माहिती
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची राज्यपालांची शिफारस

पवार साहेबांमुळेच मी राजीव गांधींना जवळून पाहिलं

- आमदार वैभव पिचड (विधानसभा मतदारसंघ, अकोले, जि. नगर)
बुधवार, 12 डिसेंबर 2018

खरं, तर राजीव गांधी यांची भेट कदाचित ती माझी राजकीय पायाभरणी असेल, असे मला वाटते. पिचड कुटुंबावरील संपुर्ण पवार कुटुंबियांचे प्रेम हे सर्व देशाला माहीत आहे. सर्व क्षेत्रातील राजकीय संधी पिचड कुटुंबाला पवार यांच्यामुळेच मिळाल्या आहेत.- वैभव पिचड

माझ्या बालपणापासूनच आदरणीय शरद पवार साहेब यांच्या विचारांचा पगडा माझ्यावर आहे. आमचे दादा आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पवार साहेबांचे मार्गदर्शन व प्रेम आम्ही अगदी जवळून अनुभवले आहे. तालुक्यातील अनेक कामे मार्गी लावताना पिचड साहेबांचा शब्द कधीच डावलेला नाही. पवार साहेबांमुळेच मी तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांना भेटू शकलो, हे मी कधीच विसरू शकत नाही. ही भेट म्हणजे माझ्या जीवनाची मोठी आठवण आहे.

खरं, तर राजीव गांधी यांची भेट कदाचित ती माझी राजकीय पायाभरणी असेल, असे मला वाटते. पिचड कुटुंबावरील संपुर्ण पवार कुटुंबियांचे प्रेम हे सर्व देशाला माहीत आहे. सर्व क्षेत्रातील राजकीय संधी पिचड कुटुंबाला पवार यांच्यामुळेच मिळाल्या आहेत. परवा मधुकरराव पिचड लिलावती हॉस्पिटलमध्ये आजारी असताना वेळातवेळ काढून पवार यांनी भेट दिली, मला धीर दिला, ही मौलिक भेट माझ्यासारख्याला खूप काही शिकवून गेली. अजितदादा तर मला वैभव व आदरणीय सुप्रियाताई ह्या मला वैभव भाऊ म्हणून बोलावतात, हीच भावना कौटुंबिक प्रेमाचे प्रतीक आहे. असे मला वाटते.

पवार साहेब माझी आस्थेने चौकशी करतात, त्यामुळेच विरोधात काम करण्याचा उत्साह व प्रेरणा मिळते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवकांना व महिलांना संधी देणे, हे धोरण पवार यांनी घेतले, ही बाब देश हिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. पवार व पिचड या दोघांचेही लक्ष तालुक्यातील प्रत्येक घटनेवर व विकास कामावर असल्याने माझीही जबाबदारी वाढली आहे. याची मला जाणीव आहे. तालुक्यातील पाण्याचे फेर वाटप, निळवंडे धरण, छोटोमोठी धरणे, वीज रस्ते, आदिवासी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक बजेट,असे कितीतरी विकासकामांत पवार यांचे मोठे योगदान दिलेले आहे व अजूनही देत आहेत. आमच्या घरावर हल्ले झाले होते, त्याप्रसंगी पवार आमच्या कुटुंबियांच्या पाठिमागे खंबीरपणे उभे होते. ते मी स्वतः अनुभवले.

अधिवेशन काळातील गोवारी समाज आरक्षण मोर्चाप्रसंगी घडलेल्या दुर्दैवी घटनेप्रसंगी पवार साहेबांनी पिचड साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ती परिस्थिती हाताळली होती. गुजरातमधून नवापूर अक्कलगोवा येथे पायी जाऊन  पिचड यांच्याबरोबर पवार साहेबांनी आदिवासी समाजाचे दारिद्रय पाहिले, त्यावेळी त्यांचे हृदय पिळवटून निघाले व त्यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक बजेट केले. 

मी प्रथम आमदार झाल्यानंतर पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मला वैभव म्हणून जवळ बोलावून घेतले. आस्थेने माझी व तालुक्याची चौकशी केली, त्यावेळी कळाले की ही माणसे मोठी का आहेत. तरुणांना राजकीय संधी देताना त्यांची दृष्टी त्या युवकामधील कार्यक्षमता पहात असते. असे जाणवले, ते तरुण आहेत, म्हणून पवार साहेबांनी कधीही टाळले नाही, उलट नावानिशी हाक मारून त्यांची चौकशी करताना मी त्यांना पाहिले.

अकोले तालुक्यातील मोबाईल टॉवरच्या प्रश्नावर मुंबई येथे पवार यांची भेट घेतली, त्यांनी प्रश्न समजावून घेतला व त्याचे गांभीर्य लक्षात आल्याबरोबर केंद्रीय दूरध्वनी मंत्र्याबरोबर संपर्क साधून ह्या कामात लक्ष तातडीने घालण्यास सांगितले व अशी अडचणीची कामाबद्दल सांगत जा, असे सांगितले. अशा आदर्श महनीय व्यक्तीमत्वाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतांना त्यांना उत्तम आरोग्यदायी आयुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या हिमालयाच्या उंचीपेक्षा उंच असलेल्या कार्यकर्तृत्वास सलाम करतो.
(शब्दांकन : विद्याचंद्र सातपुते)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख