चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडावा :  सुरेश धानोरकर 

कॉंग्रेसमध्ये जाण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. मी काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात नाही . पण जिल्ह्यातील काही काँग्रेस नेत्यांना मी काँग्रेसमध्ये यावे असे वाटते . म्हणून ते माझ्याशी संपर्क ठेवून आहेत पण मी इच्छुक नाही .-सुरेश धानोरकर
DhanorkarThakre
DhanorkarThakre

नागपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडावा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर यांनी केली आहे.

 आमदार धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ सेनेसाठी सोडावा किंवा या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी सूचना आमदार धानोरकर यांनी केली. 

आमदार धानोरकर यांनी आपण काँग्रेस पक्षात जाणार असल्याचे वृत्त फेटाळले आहे .  आमदार धानोरकर म्हणाले," काँग्रेसमध्ये जाईन असे मी म्हणालोच नाही .  कॉंग्रेसमध्ये जाण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेसाठी सोडावा, अशी आपली मागणी आहे. हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडता येत नसेल तर भाजप-शिवसेनेमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ द्यावी, अशी माझी सूचना आहे."

"गेली पाच वर्षे भाजपने शिवसेनेला योग्य वागणूक दिली नाही. वारंवार शिवसेना नेत्यांचा अपमान करण्याचे काम भाजपच्या नेत्यांनी केले आहे. भाजपने युतीचा धर्म न पाळल्याने या स्थितीमध्ये पुन्हा भाजपसोबत काम करणे शक्‍य नसल्याची  भूमिका शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर यांनी  मांडली. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले उपकार विसरणार नाही. शिवसेनेने आपल्याला खूप काही दिले आहे.  अशा शब्दात शिवसेना आमदार सुरेश धानोरकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भात ते म्हणाले,"  कॉंग्रेसमध्ये जाण्याचे वृत्त योग्य नाही. या संदर्भात निर्णय झाला नाही. मी काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात नाही . पण जिल्ह्यातील काही काँग्रेस नेत्यांना मी काँग्रेसमध्ये यावे असे वाटते . म्हणून ते माझ्याशी संपर्क ठेवून आहेत पण मी इच्छुक नाही . "

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com