mla sunil thingres use name for money who r they | Sarkarnama

 राष्ट्रवादी आमदाराच्या नावाने खंडणी मागणारे पुण्यातले "ते' कोण ? 

अन्वर मोमीन 
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

वडगाव शेरी (पुणे) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाने पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक व बड्या ठेकेदारांना फोनवरून धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. आमदार टिंगरे यांनी विश्रांतवाडी पोलीसांकडे याविरोधात तक्रार दिली असून माझी बदनामी करण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या व्यवस्थापकाला 8070981333 या मोबाईल नंबर वरून फोन आला. नवा नंबर असल्यामुळे ट्रूकॉलर या ऍप्लिकेशनने या नंबरचे नाव एमएलए टिंगरे सुनिल असे दाखवले. कदाचित हा आमदारांचा नंबर असावा म्हणून व्यवस्थापकाने फोन घेतला. त्यावेळेस समोरच्या व्यक्तीने आमदार सुनील टिंगरे यांच्या कार्यालयातुन बोलत असून पन्नास हजार रुपये रोख कार्यालयात पाठवून द्या असे बजावले. 

त्याचप्रमाणे पुण्यातील रस्त्यांचे काम करणाऱ्या बड्या ठेकेदारासही वरील क्रमांकावरुनच फोन केला गेला. प्रभागात महिलांना शिलाई मशीन वाटायच्या असून त्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी 38 शिलाई मशीन तातडीने पाठवून देण्याची धमकी या ठेकेदारास देण्यात आली. विशेष म्हणजे या ठेकेदाराने अडतीस शिलाई मशीन एका गाडीत भरुन ही गाडी आमदारांच्या कार्यालयाकडे पाठवली. ज्यांनी खंडणी मागितली ते कोण याचा तपास पोलिस करीत आहेत. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख