आजचा वाढदिवस : सुनील केदार, आमदार - सावनेर (नागपूर)  - mla sunil kedar birthday | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : सुनील केदार, आमदार - सावनेर (नागपूर) 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 एप्रिल 2018

नागपूर जिल्ह्यात कॉंग्रेसचा गड शाबूत राखण्यात सुनील केदार यांना यश आले. जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघापैकी केवळ सावनेर मतदारसंघात कॉंग्रेसचे सुनील केदार विजयी झाले. सहकारी क्षेत्रात बडे प्रस्थ असलेले बाबासाहेब केदार यांचे सुपुत्र असलेले सुनील केदार गेल्या 20 वर्षांपासून सावनेर मतदारसंघावर वर्चस्व राखून आहेत. 1995 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले केदार यांनी पुढे कॉंग्रेसची धुरा सांभाळली. बाबासाहेब केदार यांच्या मृत्यूनंतर सहकार क्षेत्रावरही सुनील केदार यांनी प्रभाव कायम राखला आहे. नागपूर ग्रामीण जिल्ह्यात कॉंग्रेसचा चेहरा म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ओळखले जातात.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख