सुमनताईंचा फोन गेल्यावर दादांनी तासगांवकरांचाही प्रश्न सोडविला!

अंजनी येथील घरातून हे मायलेकसतत अधिकारी आणि लोकांच्या संपर्कात आहेत.
mla sumantai patil called ajit pawar and raise issue of grape transport
mla sumantai patil called ajit pawar and raise issue of grape transport

पुणे : तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघ आर आर पाटील यांचा. या मतदारसंघात आबांच्यानंतर सुमनताई पाटील दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत. महापूराच्या काळात सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी लोकांना धीर दिला होता. आता कोरोनाच्या काळातही या मायलेकरांनी आपल्या लोकांना धीर देत येईल ती अडचण सोडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. 

अंजनी येथील घरातून ते सतत अधिकारी आणि लोकांच्या संपर्कात आहेत. तासगाव हा द्राक्षांचा तालुका. द्राक्षाचा हंगाम सध्या सुरू आहे पण लॉकडाऊनमुळे तालुक्यातून मुंबई पुण्याला जाणारी द्राक्षाची वाहने अडवण्यात येतात. काही वाहनांच्या चालकांना याचा त्रास झाला. याची माहिती सुमनताई पाटील यांच्यापर्यंत गेल्यावर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तालुक्यातील द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला.
 त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगलीच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले. तासगावसह, पूर्व खानापूर, कवठेमहांकाळ या तालुक्यातील द्राक्ष वाहतूक करणाऱ्या वाहनांना आणि त्यांच्या चालकांना महसूल विभागाकडून पास देण्यात येणार आहेत. या पासमुळे  त्यांना वाहतूक करणे शक्य होणार आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
 जे लोक बाहेर आहेत, त्यांना फोन करून रोहित पाटील दिलासा देत आहेत. काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com