MLA Sudhakar Bhalerao has 28 challengers in BJP | Sarkarnama

उदगीरमध्ये आ.सुधाकर भालेरावांना भाजपचेच 28 स्पर्धक !

युवराज धोतरे
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

राखीव मतदारसंघ असूनही उमेदवारांची भाऊगर्दी

उदगीर  :  भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी (ता 6) रोजी लातूर येथे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात सर्वाधिक उदगीर राखीव मतदार संघासाठी एकूण 29 उमेदवारांनी उमेदवारी मागितली आहे.

मतदारसंघ राखीव असूनही उमेदवारी मिळवण्यासाठी सहापैकी सर्वात जास्त मागणी ही उदगीर मतदार संघात नोंदवली गेल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्या दहा वर्षापासून उदगीर मतदार संघावर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व आहे भाजपाचे विद्यमान आमदार सुधाकर भालेराव हे दहा वर्षापासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 

यावेळी त्यांना पक्षांतर्गत रोषाला सामोरे जावे लागत असल्याने व पक्षातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांच्या उमेदवारीला विरोध केल्याने उमेदवार बदलणार असल्याच्या शक्यतेमुळे इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

शुक्रवारी (ता.7) रोजी लातूरच्या शासकीय विश्रामगृहावर भाजपचे बीड लातूर जिल्हा निरीक्षक तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी ह्या मुलाखती घेतल्या.  यावेळी उदगीर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार सुधाकर भालेराव, अश्वजीत गायकवाड, डॉ अनिल कांबळे, प्रा पंडित सूर्यवंशी, संजय बोलकर, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती बालाजी दोरवे,

माजी आमदार राम गुंडीले, नामदेवराव कदम, बालाजी गवारे, नरेश सोनवणे, पप्पू गायकवाड, दिग्विजय काथवटे, शिवाजी लकवाले, गणेश गायकवाड, लक्ष्मण अदावळे, दयानंद कांबळे, बालाजी गवारे, मोहन माने, केशव कांबळे याच्यासह 29 जणांनी उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षनिरीक्षकाकडे अर्ज दाखल केला आहे.

लातूर जिल्ह्यातील लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, औसा, निलंगा व उदगीर या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वात जास्त उमेदवारीची मागणी ही उदगीर राखीव मतदारसंघासाठी करण्यात आली आहे त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून उदगीर मतदारसंघाला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

 तिढा कसा सोडवणार?
उदगीर राखीव मतदारसंघासाठी सर्वाधिक उमेदवारांनी उमेदवारीसाठी अर्ज केल्याने उदगीरला उमेदवारी द्यायची कोणाला हा पक्षी सृष्टीसाठी डोकेदुखीचा विषय ठरणार आहे उदगीरचा तिडा पक्षश्रेष्ठी कसा सोडणार याकडे उदगीरकर यांचे लक्ष लागले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख