Mla Sons from Vidarbha Ready to Enter Politics | Sarkarnama

आमदारपुत्र जिल्हा परिषदेच्या रिंगणात; राजकीय कारकीर्दीची सुरुवात करण्यास इच्छुक

वीरेंद्रकुमार जोगी
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

जिल्ह्यातील अनेक आमदारांनी त्यांचे राजकीय करिअर जिल्हा परिषदेतून सुरू केले आहे. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत मुलांनाही राजकीय कारकिर्द उज्जवल करायची तयारी करीत आहेत. आजी-माजी आमदारपुत्र-पुत्री देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

नागपूर : जिल्ह्यातील अनेक आमदारांनी त्यांचे राजकीय करिअर जिल्हा परिषदेतून सुरू केले आहे. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत मुलांनाही राजकीय कारकिर्द उज्जवल करायची तयारी करीत आहेत. आजी-माजी आमदारपुत्र-पुत्री देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

सावनेरचे माजी आमदार देवराव आसोले याचे पुत्र अॅड. गजानन हे पारशिवनी तालुक्‍यातील गोंडेगाव सर्कलमधून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी केली आहे. सर्वसाधारण सर्कल असल्याने येथून लढणारे अनेक असले तरी त्यांनी निवडणुकीसाठी पूर्वीपासूनच तयारी केली आहे. त्यांची उमेदवारी डावल्यास भाजपला येथे मोठा फटका बसू शकतो अशीही चर्चा सर्कलमध्ये रंगू लागली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री तसेच काटोलचे आमदार अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल हे देखील जिल्हा परिषद निवडणूक लढविणार आहेत. ते काटोल तालुक्‍यातील येणवा, मेटपांजरा किंवा पारडसिंगा सर्कलमधून लढणार असल्याची चर्चा आहे. या तिन्ही सर्कलमध्ये ते सध्या चाचपणी करीत आहे. येणवा सर्कलमधून ते निवडणूक लढविणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत हे देखील जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करीत असल्याची माहिती आहे. त्यांचा सर्कल अद्याप निश्‍चित नसल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांचे पुत्र अनुराग हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.

यांचा मात्र नकार
सावनेरचे आमदार सुनील केदार यांच्या पुत्री डॉ. पोर्णिमा केदार-चिंचमलातपुरे यांची सावनेर तालुक्‍यातील वाकोडी सर्कलमधून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचे सांगून चर्चेला विराम दिला आहे. याशिवाय माजी आमदार सुधीर पारवे यांचे पुत्र रोहित यांनी पुढील दोन वर्षे निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख