'संजीवनी'ने केलेल्या मदतीची नोंद घ्यावी : स्नेहलता कोल्हे

कोणत्याही भूलथापांना बळी न पडता महायुतीच्या पारड्यात मताधिक्‍य टाकावे.
'संजीवनी'ने केलेल्या मदतीची नोंद घ्यावी : स्नेहलता कोल्हे

कोपरगाव (नगर) : "गोदावरी नदीकाठच्या भागात 2006 व 2019 मधील महापुरात बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी उद्योगसमूहाने यशस्वीरीत्या राबविलेल्या सुरक्षा अभियानामुळे कुठलीही जीवितहानी तर सोडाच; पण संसारोपयोगी वस्तूंचेही नुकसान होऊ दिले नाही. मतदारांनी या सगळ्या घटनांची जाणीवपूर्वक नोंद घ्यावी,'' असे आवाहन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

शहरातील जुन्या तहसील कार्यालय परिसरात आयोजित कोपरासभेत कोल्हे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी 1969 च्या महापुरात आणि अन्य आपत्तीत आमदार असताना मोठे काम केले. तोच वारसा आम्हा कुटुंबीयांकडे आहे. जनतेची कामे करीत राहून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक योगदानात पाठबळ देत राहा. तहसील कार्यालय परिसरात झालेल्या महापूर आपत्तीत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या साथीने, तसेच "संजीवनी'च्या आपत्ती निवारण पथकाच्या साहाय्याने, संजीवनी प्री-कॅडेट ट्रेनिंग सेंटरच्या सहकार्याने पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविले. त्यांच्या अन्न-पाण्याची, निवाऱ्याची काळजी घेतली.''

"कोपरगावकरांच्या प्रत्येक समस्येच्या निराकरणासाठी सर्वांचे सहकार्य मिळाले. निळवंडे-शिर्डी-कोपरगाव पाणीयोजनेबाबत औरंगाबाद खंडपीठात आपल्याच बाजूने निर्णय अपेक्षित आहे. आपल्या पाठीशी एक लाख कोपरगावकरांचे आशीर्वाद असल्याने आत्मविश्वास आला आहे. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता महायुतीच्या पारड्यात मताधिक्‍य टाकावे. त्याच तळमळीने शहरवासीयांच्या समस्या सोडवू,'' अशी ग्वाही कोल्हे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com