आमदार शिवेंद्रसिंहराजे सपत्निक निघाले एव्हरेस्ट बेसकॅम्पला  - mla shivendrraje and his wife go for everest base camp | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार शिवेंद्रसिंहराजे सपत्निक निघाले एव्हरेस्ट बेसकॅम्पला 

उमेश भांबरे
रविवार, 30 सप्टेंबर 2018

राजकीय नेत्यांना वैयक्तिक छंदासाठी सवड अशी नसतेच. त्यातही सातारा जिल्ह्यातील प्रत्येक बाब ही राजकारणाशी निगडीत असते. पुन्हा उदयनराजेंशी संघर्ष असलेल्या नेत्याला तर जिल्हा सोडणे अवघड होऊन बसते. मात्र या संघर्षांला काही दिवस विराम देत आमदार शिवेंदसिंहराजे यांनी हिमालयाचा रस्ता पकडला आहे.  

सातारा : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पत्नी वेदांतिकाराजे सोबत एव्हरेस्ट बेसकॅम्पसाठी आज साताऱ्यातून रवाना झाले आहेत. मंगळवारी सकाळी त्यांच्या मोहिमेस सुरवात होणार असून एकुण 5550 मीटर उंचीवर पाच दिवस चालत जाऊन ते गोरखक्षेप या बेसकॅम्पवर पोहोचणार आहेत. त्यांच्यासमवेत एकुण सात जण आहेत. 

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या साताऱ्यातील दोन राजांतील संघर्ष सुरू आहे. आनेवाडी टोलनाका धुमश्चक्रीच्या घटनेमुळे मागील वेळी त्यांना या कॅम्पसाठी जाता आले नव्हते. कार्यकर्त्यांना सोडून ते या कॅम्पसाठी जाऊ शकले नाहीत. पण आज ते या कॅम्पसाठी रवाना झाले आहेत. त्यांच्यासमवेत पत्नी वेदांतिकाराजे भोसले, विक्रमराजे भोसले तसेच अन्य चार जणांचा समावेश आहे.

एव्हरेस्टच्या गोरखक्षेप येथील बेसकॅम्पला ते जाणार आहेत. 5550 मीटर उंचीवर हा एव्हरेस्टचा बेसकॅम्प आहे. येथे जाण्यासाठी पाच दिवस लागणार असून हा प्रवास ते पायी करणार आहेत. सपत्निक एव्हरेस्ट बेसकॅम्पला जाणारे ते पहिले आमदार असल्याचे मानले जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख