mla shivendraraje criticize sanjay raut | Sarkarnama

काय पुरावा द्यायचा ते संजय राऊतांनी सांगावे!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

त्यांनी त्यांची भाषा जपून वापरावी. 

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांबाबत संजय राऊतांना काय पुरावा हवा आहे, असा सवाल साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांबाबत पुरावे मागितले आहेत, यासंबंधाने शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, संजय राऊत यांना काय पुरावा द्यायचा हे त्यांनीच सांगावे.  

संजय राऊत यांच्याकडून अतिरेक होत आहे असे तुम्हाला वाटते का, या प्रश्‍नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, हो ते खासदार तसेच पत्रकार आहेत. त्यांनी त्यांची भाषा जपून वापरावी. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख