mla sharad sonwane claims raj thakrey as guru | Sarkarnama

`पवारांचे चेले` आमदार सोनवणे म्हणतात राज ठाकरे हेच माझे गुरू! 

उमेश घोंगडे
शुक्रवार, 27 जुलै 2018

पुणे : विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असताना सगळ्यांनी मला उमेदवारीसाठी नकार दिला. मात्र माझ्यावर विश्‍वास ठेऊन आमदारकीचे तिकीट देणारे राज ठाकरे हे माझे खरे गुरू आहेत. राज्याच्या राजकारणाला दिशा देण्याची क्षमता केवळ राज ठाकरे यांच्याकडेच आहे, या शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी ठाकरे यांचे कौतुक केले. 

पुणे : विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असताना सगळ्यांनी मला उमेदवारीसाठी नकार दिला. मात्र माझ्यावर विश्‍वास ठेऊन आमदारकीचे तिकीट देणारे राज ठाकरे हे माझे खरे गुरू आहेत. राज्याच्या राजकारणाला दिशा देण्याची क्षमता केवळ राज ठाकरे यांच्याकडेच आहे, या शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी ठाकरे यांचे कौतुक केले. 

राजकारणाच्या फडात सोनवणे हे कधी भाजपाच्या तर कधी शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आज मनसेच्या व्यासपीठावर हजेरी लावली.  राज ठाकरे यांचे शिष्य असल्याचे सांगत केवळ ठाकरे यांनी उमेदवारी दिल्यामुळेच आपण कसे आमदार झालो हे सांगितले. मनसेच्या माध्यमातून राज्यभर सामान्य माणसाची कामे होत आहेत. सामान्यांचा आणि युवकांचा खरा पक्ष मनसेच असल्याचे सांगत पक्षाची खरी ताकद येत्या निवडणुकीत कळल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

राज्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्‍न आहेत. मात्र राज्य सरकारला या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यात साफ अपयश आले आहे. दूरदृष्टी आणि धडाडीच्या नेतृत्वाशिवाय शेतकऱ्यांपुढील प्रश्‍न सुटणे अवघड आहे. राज्यापुढेही आणखी अनेक प्रश्‍न आहेत या साऱ्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीची क्षमता राज ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आहे, असेही गुणगाण त्यांनी गायले. 

सोनवणे यांनी १९ जून रोजी जुन्नरमध्ये झालेल्या कार्यक्रमात आपण शरद पवार यांचे चेले असल्याचे त्यांच्यात उपस्थितीत सांगितले होते. यावर पवार यांनी तिरकस प्रतिक्रिया दिली होती. पवार म्हणाले,``महिनाभरापूर्वी शिवसेनेचे नेते आणि  संजय राऊत जुन्नरला आले होते. त्या वेळी सोनवणे यांनी मी त्यांचा चेला असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता मला माझीच काळजी वाटायला लागली आहे.`` पवार यांच्या गुगलीनंतर सभेत एकच हशा उडाला होता. त्यानंतर सोनवणे यांनी आज पुन्हा राज ठाकरे यांना गुरू म्हणून गुरूपौर्णिमेनिमित्त वंदन केले. 

वाचा आधीची बातमी-मनसे आमदार सोनवणे म्हणतात मी पवारांचा चेला पण; पवारांनी घेतली फिरकी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख