mla shambhuraj desai about maratha agitation | Sarkarnama

#MarathaReservation कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालेच पाहिजे : शंभूराज

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

सातारा : मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासाठी गुरूवारी (ता. 9 ऑगस्ट) जिल्हा व तालुकापातळीवर ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनास गालबोट न लावता शांततेच्या मार्गाने आंदोलन करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करूया, असे आवाहन पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकाव्दारे केले आहे. 

आमदार देसाई यांनी पत्रकात म्हटले की, आतापर्यंत निघालेल्या शांततेच्या मोर्चांना हिंसक वळण लागू लागले आहे. यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होत आहे. नऊ ऑगस्टचे ठिय्या आंदोलनात आपण स्वत: सहभागी होणार असून जिल्हा, तालुकापातळीवर ठिय्या आंदोलन किंवा यानिमित्ताने पाळण्यात येणारा बंद हा शांततेच्या मार्गाने कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडावे. 

इतके वर्षे आरक्षणापासून वंचित राहिलेल्या मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालेच पाहिजे, याकरीता सर्वपक्षीय मराठा आमदारांनी वेळोवेळी राज्य शासनाकडे यासंदर्भातील आपली ठाम भूमिका मांडली आहे. आरक्षणाच्या मागणीवर आम्ही आजही मराठा समाजाबरोबर ठाम आहोत आणि कायम ठाम राहणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख