MLA Seema Hire Diwali Preparation | Sarkarnama

हिरे कुटुंबाचे पै-पाहुणे म्हणतात, आमदार सीमाताईंच्या चिवडा, लाडवाची चवच न्यारी! 

संपत देवगिरे 
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

लोकप्रतिनिधी म्हणुन मतदारसंघातील नागरीकांना दिवाळीच्या शुभेच्छा अन्‌ त्यांच्या अडी-अडचणी, तक्रारी दिवाळीतही सुरुच असतात. मात्र, या धावपळीतूनही आमदार हिरे दिवाळीचा सण पारंपरिक उत्साहाने साजरा करतात. कुटुंबियांसमवेत खरेदी, घराची सजावट यांसह अगदी पाहुण्यांसाठीचा फराळही त्या स्वतः आवडीने तयार करतात.

नाशिक : दिवाळी म्हणजे अबाल -वृध्दांना आनंदी करणारा प्रकाशोत्सव. या दिवाळीत गृहिणींची आठवडाभर फराळाची लगबग असते. सेलीब्रिटी, आमदार- खासदारही अपवाद नसतात. येथील आमदार सीमाताई हिरेही सध्या दिवाळीचा फराळ बनविण्यात व्यग्र आहेत. सणाच्या निमित्ताने त्यांचे सर्वच आप्तस्वकीय घरी एकत्र येतात. सीमाताईंच्या हातचे रव्याचे लाडू अन्‌ खमंग चिवड्याच्या कौतुकात ते दंग होतात, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. 

लोकप्रतिनिधी म्हणुन मतदारसंघातील नागरीकांना दिवाळीच्या शुभेच्छा अन्‌ त्यांच्या अडी-अडचणी, तक्रारी दिवाळीतही सुरुच असतात. मात्र, या धावपळीतूनही आमदार हिरे दिवाळीचा सण पारंपरिक उत्साहाने साजरा करतात. कुटुंबियांसमवेत खरेदी, घराची सजावट यांसह अगदी पाहुण्यांसाठीचा फराळही त्या स्वतः आवडीने तयार करतात. त्यांचे माहेर व सासर दोन्हीही नाशिकमध्येच. त्यामुळे भाऊबीजेला त्यांचे आप्तस्वकीय मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी एकत्र येतात. त्यांचा पाहुणचारही तेव्हढ्याच उत्साहाने होतो. 

यामध्ये स्वागताला चिवडा, चकली, शेव, रव्याचे लाडू, अनारसे असा विविध फराळ असतो. पूर्वी त्या स्वतः सर्व पदार्थ बनवत. सध्या कामकाज वाढले. त्यामुळे सर्वच पुर्वी एवढे जमत नाही. मात्र, सगळ्यांच्या पसंतीला उतरणारे रव्याचे लाडू आणि चिवडा मात्र त्या स्वतः करतात. यंदाही त्यांनी हे पदार्थ केले आहेत. अनेक वर्षांचा पायंडा त्यांनी कायम ठेवला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख