आमदार संजय गायकवाड यांनी डोक्यावर घेतली चप्पल !

..
mla chappal.
mla chappal.

बुलडाणा  : 15 वर्षांच्या संषर्घानंतर आमदार झालेल्या शिवसेनेच्या बुलडाणा आमदार संजय गायकवाड यांनी कार्यकर्त्याच्या चप्पल डोक्यावर घेतल्या आणि त्याला त्या भेट दिल्या. 


जोपर्यंत संजय गायकवाड आमदार होत नाही तो पर्यंत पादत्राणे पायात घालणार नाही असा प्रण घेऊन तब्बल 15 वर्षापासून अनवाणी पायांनी फिरणार्‍या कार्यकर्त्याला संजय गायकवाड आमदार होताच त्यांनी डोक्यावर पादत्राणे घेऊन त्याच्या गावाला भेट दिली . कार्यकर्त्याचे  पाय धुवून त्याला पादत्राणे घातली. 15 वर्षापासून सुरू असलेल्या त्याचा प्रण तोडला.


 ही घटना मोताळा तालुक्यातील नेहरूनगर येथील रहिवासी असलेला अनिल शंकर पवार याची आहे. अनिल पवार हा कार्यकर्ता संजय गायकवाड यांचेशी गेल्या 15 वर्षापासून जुळला आहे. छावा संघटनेत असतांना संजय गायकवाड यांनी 2004 मध्ये विधानसभा निवडणूक लढविली. या निवडणुकीत थोड्या फरकाने गायकवाड यांचा पराभव झाला होता . 


हा  झालेला पराभव अनिल पवार यांच्या  जिव्हारी लागला. त्यानंतर जो पर्यंत संजय गायकवाड आमदार होत नाही तो पर्यंत आपण पायात पादत्राणे घालणार नाही. असा प्रण त्याने घेतला होता. अखेर संजय गायकवाड यांचा विधानसभेत  विजय झाला आणि ते आमदार झाले. 


आमदार होताच आपल्या या निष्ठावंत गरीब कार्यकर्त्याची आठवण आमदार गायकवाड यांना झाली. विजयाच्या जल्लोषात न रमाता अहोरात्र काम करणार्‍या या कार्यकर्त्याच्या गावात जाऊन गायकवाड यांनी स्वखर्चाने घेतलेले पादत्राणे डोक्यावर ठेवून त्याच्या घरापर्यंत पायदळ गेले.

अनिल पवार याचे पाय धुवून त्याच्या पायात पादत्राणे घातले. नंतर शाल व श्रीफळ देवून त्याचा सत्कार केला. कार्यकर्त्याचा हा सन्मान आणि आगळावेगळा सत्कार पाहून गावकरी चकित झाले. यावेळी आ.गायकवाड यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com