न्यायालयीन कोठडीतले आमदार संग्राम जगताप तेवीस दिवसांत तिसऱ्यांदा घाटीत दाखल 

केडगांव येथे सात एप्रिलला शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांना पोलीसांनी अटक केली. नगर येथील न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण जामीन घेण्यास नकार दिल्याने त्यांची रवानगी औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात करण्यात आली.
न्यायालयीन कोठडीतले आमदार संग्राम जगताप तेवीस दिवसांत तिसऱ्यांदा घाटीत दाखल 

औरंगाबाद : नगर जिल्ह्यातील केडगांव दुहेरी खुन प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार संग्राम जगताप सोमवारी (ता. 11) पुन्हा घाटीत दाखल झाले. उलट्या आणि अतिसाराचा त्रास होत असल्याची तक्रार केल्याने त्यांना तुरूंग प्रशासनाने घाटीत भरती केले. मेडिसीन विभागातील वॉर्ड क्रमांक सहा या आयसोलेशन वॉर्डात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याआधी किडणीत पाण्याची गाठ झाल्यामुळे संग्राम जगताप सतरा दिवस घाटीत दाखल होते. 

केडगांव येथे सात एप्रिलला शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांना पोलीसांनी अटक केली. नगर येथील न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण जामीन घेण्यास नकार दिल्याने त्यांची रवानगी औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात करण्यात आली. 

दरम्यान पोटदुखीचा त्रास होत असल्याची तक्रार केल्याने पोलीसांनी संग्राम जगताप यांना 21 मे रोजी घाटीतील वार्ड क्रमांक दोनमध्ये दाखल केले होते. सर्व प्रकारच्या चाचण्या केल्यानंतर दोन जूनला जगताप यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पण त्रास जाणवत असल्याचे सांगत पुन्हा तासाभरातच जगताप घाटीत दाखल झाले. 

तीन दिवस उपचार घेतल्यानंतर पाच जूनला संग्राम जगताप यांना घाटीतून सोडण्यात आले होते. हर्सूल कारागृहात पाच दिवस राहिल्यानंतर त्यांनी रविवारी (ता. 10) पुन्हा उलट्या व हगवण लागल्याची तक्रार केली आणि त्यांना घाटीत डॉ. उद्धव खैरे यांच्या युनिटला दाखल करण्यात आले. आमदार जगताप यांना गॅस्ट्रोचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मेडिसीन विभागातील पथकाचे प्रमुख डॉ. उद्धव खैरे यांनी दिली. 

तेवीस दिवसांत तीनदा भरती
21 मे ते 10 जून या तेवीस दिवसांत संग्राम जगताप तीनवेळा घाटीत रुग्णालयात दाखल झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. राजकीय दबाव आणून जगताप वारंवार रुग्णालयात भरती होत असून त्यांची तिथे बडादास्त ठेवली जात असल्याची चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com