तोपर्यंत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप तुरुंगातच राहणार! 

तोपर्यंत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप तुरुंगातच राहणार! 

नगर: केडगाव हत्त्याकांडाच्या कटात संशयित आरोपी असलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार संग्राम जगताप न्यायालयीन कोठडीतून बाहेर येण्याचे नाव घेईनात. या प्रकरणाचा संपूर्ण तपास लागेपर्यंत आपण जामीन घेणार नसल्याचा हट्ट त्यांनी धरला असल्याने गेल्या एक महिन्यांपासून ते न्यायालयीन कोठडीतच आहेत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या कोठडीत पुन्हा वाढ केली आहे. 

केडगाव येथे सात एप्रिल रोजी शिवसेनेच्या संजय कोतकर व वसंत ठुबे या दोन पदाधिकाऱ्यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून निघृणपणे हत्या झाली. याच दिवशी सायंकाळी पोलिसांनी संशयावरून राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र जगताप यांना कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातून पळवून नेले. नंतर रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पोलिस कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. कोठडीची मुदत संपल्यानंतर जामीनासाठी त्यांनी अर्ज करणे अपेक्षित असताना आमदार जगताप यांनी जामीनासाठी अर्ज देण्यास नकार दिला. जोपर्यंत या गुन्ह्याचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत जामीनावर बाहेर येणार नाही, अशी भूमिका जगताप यांनी घेतली आहे. त्यामुळे शहरातील कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com