शहरा लगतच्या पिकांचे तत्काळ पंचनामे करा : संग्राम जगताप

jagtap_sangram.
jagtap_sangram.

नगर : शहर हद्दीतील केडगाव, बोल्हेगाव, नागापूर, नालेगाव, बुरुडगाव परिसरातील फळपिके, पालेभाज्यांसह अन्य पिकांचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी आज तहसीलदारांकडे केली.

आमदार जगताप यांनी शिष्टमंडळासह सोमवारी (ता. 4) तहसीलदार उमेश पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. निवेदनात म्हटले, की अतिवृष्टीने शहरालगत असलेल्या शेतीचे नुकसान झाले. शेतातील उभी पिकेही सडली आहेत. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणेला नालेगाव, बोल्हेगाव, केडगाव व बुरुडगाव इत्यादी परिसरातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत.

या वेळी नगरसेवक कुमार वाकळे, सुमीत कुलकर्णी, विलास जाधव, उद्धव कुलट, जालिंदर कुलट, बाळासाहेब जाधव, बंडू कुलट, फारुख पठाण आदी उपस्थित होते. दरम्यान, कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने पंचनामे करण्यास उशीर होत असला, तरी तातडीने पंचनामे पूर्ण करण्यात येतील, असे तहसीलदार उमेश पाटील यांनी सांगितले.

आमदार जगताप यांना नालेगाव परिसरातील शेतकरी मुकुंद रोहोकले, प्रवीण वाघ, मनोज लांडे, सुरेश लांडे यांनी निवेदन देऊन पंचनामे करण्याची मागणी केली होती. आमदार जगताप यांनी कृषी सहायक व तलाठी यांना तत्काळ बोलावून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर प्रशासनाने तत्काळ पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू केली.

भरपाईसाठीही करणार पाठपुरावा
संकटाच्या काळात नागरिकांच्या सोबत राहणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. बाधित पिकांची नुकसानभरपाई मिळावी, म्हणून आपण जातीने लक्ष घालून पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही  आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com