आमदार संगिता ठोंबरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव! 

आमदार संगिता ठोंबरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. युवापिढी सुसंस्कारित घडविण्यासाठी आ. संगिताताई ठोंबरे युवा मंचच्या माध्यमातून 2 हजार पुस्तके शाळा, कॉलेजना भेट देण्यात आली.
आमदार संगिता ठोंबरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव! 
आमदार संगिता ठोंबरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव! 

केज (बीड) : आमदार संगिता ठोंबरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. युवापिढी सुसंस्कारित घडविण्यासाठी आ. संगिताताई ठोंबरे युवा मंचच्या माध्यमातून 2 हजार पुस्तके शाळा, कॉलेजना भेट देण्यात आली. 

वाढदिवसानिमित्त संगिताताईंना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी झाली. होती. 9 वाजल्यापासून संगिताताईंनी शुभेच्छा स्विकारल्या. लोकांशी संवाद साधत त्यांच्या परिसरातील अडचणीही समजावून घेतल्या. 

चिंचोली माळी येथे श्री कृष्णा मंदिरात जन्मष्ठीमीच्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या. सुनिल गलांडे पाटील यांच्या हस्ते संगीताताई व त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांचा सत्कार करण्यात आला. केज येथील दर्ग्यात चादर चढवण्याचा कार्यक्रमही झाला. केज उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिर घेण्यात आले. केज शहरातील जीवन शिक्षण माध्यमिक व उच माध्यमिक शाळेत संगिताताईंच्या हस्ते ध्वजरोहन करण्यात आले. यावेळी सचिव हारुनभाई इनामदार, नगरसेवक राजू इनामदार, नगरसेवक जलाल इनामदार, नगरसेवक पप्पु इनामदार, नगरसेवक मुंज्जू तांबोळी, आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com