सामान्यांच्या प्रश्नांवर आमदार संदीप क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना सुनावले

आमदार संदीप क्षीरसागर यांनी मतदार संघातील उमरद जहागीर येथे मंगळवारी जनता दरबार घेतला. सामान्यांच्या समस्या आणि प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना सांगून त्यावर तत्काळ उपाय योजना करण्याचे निर्देश दिले.
आमदार संदीप क्षीरसागर
आमदार संदीप क्षीरसागर

बीड : वीज, स्वस्त धान्य, आरोग्य सेवा, पाणी या योजना आणि सुविधा ग्रामीण भागातील सामान्यांना मिळाल्या पाहीजेत. प्रशासनाने यात हालगर्जीपणा केलेला खपवून घेणार नाही, असे निर्देश आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिले.

बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी मतदार संघातील उमरद जहागीर येथे जनता दरबार घेतला. महसूल, पोलिस, महावितरण, कृषी आदी विभागातील अधिकाऱ्यांसमक्ष लोकांनी विविध प्रश्न मांडले. गावात स्वस्त धान्य मिळत नाही, शाळेला शिक्षक नाही, रोहित्र जळाल्याने गाव महिन्यापासून अंधारात आहे, तलाठी गावात येत नाहीत अशा ढिगभर समस्यांचा पाढाच ग्रामस्थांनी यावेळी वाचला. 

आपल्या समस्या आणि प्रश्न थेट मांडा, कोणाला भीऊ नका, असे आमदार क्षीरसागरांनी सांगीतल्याने प्रश्नांची यादी वाढतच गेली. त्यामुळे शासकीय अधिकारी - कर्मचाऱ्यांचीही पाचावर धारण बसली. ग्रामीण भागातील जनतेची कामे वेळेत करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, जे तलाठी व ग्रामसेवक महिना - महिना गावात येणार नाहीत त्यांना तात्काळ करणे दाखवा नोटीस दाखवून कारवाई करा, असे निर्देश त्यांनी तहसिलदारांना दिले.

यापुढच्या काळात ठराविक लोकांचीच कामे मार्गी लावायचे व सर्वसामान्य नागरिकांना वाऱ्यावर सोडायचे, असे प्रकार यापुढे चालणार नाहीत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अंतर्गत च्या विविध योजनांमधून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवावी. जर तलाठी ग्रामसेवक गावावर हजर राहणार नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.  

तहसीलदार सचिन खाडे, कृषी विभागाचे दिलीप जाधव, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सुजित बडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. भारंबे, श्री. सानप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गंगाधर घुमरे, बबन गवते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com