आमदार संदीप क्षीरसागर रस्त्यावर हात जोडून म्हणाले बाबांनो रस्त्यावर गर्दी करु नका

मजूरांना ओळखपत्र नसल्याने बीड शहरात खासगी मजूरांमार्फत सुरु असलेले स्वच्छतेचे काम बंद होते. आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावर व पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना याबाबत फोन लावला आणि हा प्रश्न देखील मार्गी लागला.
mla sandeep kshirsagar appeals to people not to come on road
mla sandeep kshirsagar appeals to people not to come on road

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर शुक्रवारी शहरात रस्त्यावर उतरले. शहरातील स्वच्छतेसह बाजारातील वितरण व्यवस्थेची पाहणी केली. गर्दी करणाऱ्यांना हात जोडत ‘बाबांनो घरात बसा विनाकारण बाहेर पडू नका, अशी विनंतीही त्यांनी केली.

त्यांच्यासोबत माजी आमदार सय्यद सलीम, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, पंकज बाहेगव्हाणकर, मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे आणी पालिकेचे स्वच्छता कर्मचारी होते. त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, जालना रोड, सुभाष रोड, बार्शी नाका, मोमीनपुरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, सारडा नगरी परिसर यासह शहरातील भाजीपाला आणि अत्यावश्यक वस्तूंच्या वितरण व्यवस्थेची रस्त्यावर उतरून पाहणी केली. शहरात धुर फवारणी केली नसल्याचे त्यांना दिसले. मजुरांना ओळखपत्र नसल्याने काम बंद असल्याचे पालिकेने सांगितले. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्याशी फोनवरून संवाद साधत पालिकेने नियुक्त केलेल्या मजुरांना ओळखपत्र द्या अशी विनंती केली. त्यावर त्याच क्षणी जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी यांना काम तत्काळ सुरु करण्याचे निर्देश दिले.

उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत, पोलिस निरिक्षक विश्‍वास पाटील यांच्याकडून त्यांनी शहराचा आढावा घेतला. काही ठिकाणी लोकांची त्यांना गर्दी दिसली. यावेळी त्यांनी गर्दीकडे पाहत हात जोडले आणि ‘बाबांनो घरात बसा, विनाकारण बाहेर पडू नका’ अशी विनंती केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com