MLA Salvi has not done any development : Saundalkar | Sarkarnama

आमदार साळवींनी पंधरा वर्षात कोणता विकास केला? : सौंदळकर

सरकारनामा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

सौदळकर यांनी राजापूर लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात सघटना बांधणीबाबत कार्यकत्यांशी चर्चा करण्यासाठी लांजा येथे आले होते.

लांजा :  " शिवसेनेची सत्ता असताना लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघात कोणताही विकास झालेला नाही. एखादा प्रकल्प नाही. बेरोजगारी वाढली आहे. 15वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधी असलेले आमदार साळवी यांनी कोणता विकास केला, हे विचारण्याची वेळ आली आहे," अशी टीका  मनसे पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

सौदळकर यांनी राजापूर लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात सघटना बांधणीबाबत कार्यकत्यांशी चर्चा करण्यासाठी लांजा येथे आले होते. यावेळी ते म्हणाले," शिवसेना राज्यात, केंद्रात सत्तेत आहे. जिल्हा परिषद ,पंचायत समिती ताब्यात आहे. तरीही या मतदारसंघात विकास करता आलेला नाही. सहकारी तत्वावर एखादा प्रकल्प नाही. छोटे-मोठे उद्योगधंदे नाहीत. येथील रूग्णालयात डॉक्‍टरसह कोणत्याही सुविधा नाहीत. पाखाड्या वगळता कोणताही विकास झालेला नाही. आमदार साळवी पंधरा वर्ष आमदार आहेत. त्यांनी या मतदारसंघात कोणती विकास कामे केली, हा अभ्यासाचा विषय बनला आहे."

" पाचल तालुका व्हायला पाहिजे, म्हणून पाचल पंचक्रोशीतील लोक एकत्र येऊन आमदार साळवी यांना निमंत्रण करण्यास आले होते. मात्र. अशा महत्त्वाच्या जनतेच्या हितावह कामासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्व ताकदीने उतरणार आहे. विकासकाम असो वा अन्यायाविरुद्ध लढणे, भ्रष्टाचाराच्याविरुध्द आवाज उठवण्याचे काम आम्ही प्रत्यक्ष करून दाखवितो", असेही ते म्हणाले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख