mla sahmbhuraj desai, makrand patil in maratha andolan | Sarkarnama

#MaharashtraBandh भाषणबंदीमुळे फक्‍त शंभूराज, मकरंद पाटील सहभागी 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सातारा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला साताऱ्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनात वाईत आमदार मकरंद पाटील तर पाटणमध्ये आमदार शंभूराज देसाई आंदोलनात सहभागी झाले. 

तासवडे टोलनाक्‍यावर धरणे आंदोलन करून मराठा समाजाने तेथे भजन आंदोलन केले. वाई येथील आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे सहभागी झाले होते. तर पाटण मध्ये मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

या मोर्चात शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई हे सहभागी झाले होते. हे दोन आमदार वगळता उर्वरित ठिकाणी कोणीही आमदार फिरकले नाहीत. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पाच, कॉंग्रेसचे दोन तर शिवसेनेचा एक असे आठ आमदार आहेत. आठपैकी केवळ दोनच आमदारांनी मराठा आंदोलनात सहभाग नोंदविला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख