mla sadanad chavan fight for pedhe parshuram | Sarkarnama

आमदार सदानंद चव्हाणांचा लढा यशस्वी! 100 कोटींचा पेढे-परशुरामला लाभ

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 31 जुलै 2018

चिपळूण : शासकीय प्रकल्पासाठी संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदल्याची 90 टक्के रक्कम शेतकऱ्यांना आणि दहा टक्के रक्कम देवस्थानला देण्याचा निर्णय आज मंत्रालयातील बैठकीत घेण्यात आला. गेल्या 37 वर्षांपासून प्रलंबित असलेला पेढे-परशुराम येथील शेतकऱ्यांचा प्रश्‍न सोडविण्यात आमदार सदानंद चव्हाण यशस्वी झाले.
 
पेढे-परशुराम येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मुंबई-गोवा महामार्ग, कोकण रेल्वे, एमआयडीसीसाठी संपादित झाल्या आहेत. जमिनीच्या सातबारावर परशुराम देवस्थानचे नाव असल्याने देवस्थान, खोत आणि कूळ यांच्यात वाद सुरू आहे. संपादित जमिनीच्या मोबदल्याची सुमारे 100 कोटी रक्कम न्यायालयात जमा आहे.

ती मिळविण्यासाठी गेल्या महिन्यात शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयासमोर आंदोलन केले. मंत्रालयात आज बैठक झाली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. बैठकीला आमदार सदानंद चव्हाण यांच्याबरोबर आमदार वैभव नाईक, महसूल व वन विभागाचे सचिव, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, चिपळूणचे प्रांत व शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. संपादित जमिनीच्या मोबदल्याची 90 टक्के रक्कम शेतकऱ्यांना आणि दहा टक्के रक्कम देवस्थानला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय जमिनीच्या मालकी हक्काबाबत पुढील दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. 

शासकीय प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा 100 टक्के मोबदला कुळांना मिळावा, अशी मागणी केली आहे. कूळ स्वखुशीने देवस्थानला काही रक्कम देतील. जमिनीच्या मालकी हक्काचाही निर्णय लवकरच होऊन पेढे-परशुरामवासीयांना न्याय मिळेल, असे सदानंद चव्हाण यांनी सांगितले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख