ही तर महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीची श्रीमंती : रोहित पवार

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' या पुस्तकाचं प्रकाशन सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात झालं. यात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची श्रीमंती दिसली असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे
MLA Rohit Pawsar Praises Political Culture of Maharashtra
MLA Rohit Pawsar Praises Political Culture of Maharashtra

पुणे : ''आमच्यात केवळ राजकीय मतभेद असतात, पण मनभेदाला मात्र थारा नसतो. राजकारणात योग्य ठिकाणी विरोध केलाच पाहिजे पण फक्त विरोधासाठी विरोध करण्यात काही अर्थ नसतो. तसंच विरोधकाच्या विचारांना विरोध करताना वैयक्तिक जीवनात असलेल्या मैत्रीच्या नात्यात त्याचा कोणताही परिणाम होऊ दिला जात नाही. ही महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीची श्रीमंतीच आहे, असं मला वाटतं," अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' या पुस्तकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष नाना (भाऊ) पटोले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अशा सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत एकमेकांना राजकीय चिमटे काढत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात काल प्रकाशन झालं.

या कार्यक्रमाबद्दल रोहित पवार यांनी आपल्या फेसबूक पेजवर माहिती देताना राज्याच्या राजकीय संस्कृतीवर प्रकाश टाकला आहे. ''असं वातावरण लोकशाहीसाठी नेहमीच पोषक असतं आणि ते असंच राहिलं पाहिजे. या कार्यक्रमाला अनेक मंत्री, आमदार आणि अधिकारीही उपस्थित होते. मुळातच अभ्यासू अशी फडणवीस साहेबांची ओळख आहे. त्यांच्या अर्थसंकल्पाविषयीच्या सैद्धांतिक ज्ञानाचं अनेक ज्येष्ठ आमदार नेहमीच कौतुक करत असतात. श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या पुस्तकाला माझ्या मनापासून शुभेच्छा! त्यांच्या या पुस्तकाचा अभ्यासकांना आणि एक विद्यार्थी म्हणून माझ्यासारख्या अनेक तरुण आमदारांनाही निश्चित उपयोग होईल, असा मला विश्वास आहे," असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

पुस्तक प्रकाशनाच्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या आदर्श राजकीय संस्कृतीचंही पुन्हा एकदा दर्शन घडलं. सत्ताधारी, विरोधक आणि सर्वच पक्षांचे नेते या कार्यक्रमाला आवर्जून हजर होते. याचा अर्थच असा आहे की ही महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीची श्रीमंती आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com