माझ्यापेक्षा जास्त मताधिक्याने 'राष्ट्रवादी'चा उमेदवार निवडुन आणा : रोहित पवार

बारामती तालुक्यातील सिध्देश्वर निंबोडी येथील मदनवाडी तलावमधील गाळ बारामती एमआयडीसी मधील भारत फोर्ज कंपनी, बारामती अॅग्रो, व अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या मार्फत सी. एस. आर. निधीमधुन काढण्यात आला. या कामाचे लोकार्पण व तलावामधील पाण्याचे जलपूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले
MLA Rohit Pawar Felicitation at Shirsufal Baramati.
MLA Rohit Pawar Felicitation at Shirsufal Baramati.

शिर्सुफळ : गुणवडी जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातुन माझ्या राजकारणाची सुरवात झाली व तुम्हा सर्वांच्या सहकार्य व आशीर्वादानेच माझी कर्जत- जामखेड मतदार संघातून आमदार म्हणुन निवड झाली. यामुळे मी या मतदार संघाला कधीही विसरणार नाही.तसेच येणाऱ्या पोट निवडणुकीमध्ये सर्वानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहुन माझ्यापेक्षा जास्त मताधिक्याने राष्ट्रवादी चा उमेदवार निवडून आणावा, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.

बारामती तालुक्यातील सिध्देश्वर निंबोडी येथील मदनवाडी तलावमधील गाळ बारामती एमआयडीसी मधील भारत फोर्ज कंपनी, बारामती अॅग्रो, व अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या मार्फत सी. एस. आर. निधीमधुन काढण्यात आला. या कामाचे लोकार्पण व तलावामधील पाण्याचे जलपूजन करण्यात आले.

यावेळी रोहित पवार म्हणाले, ''मदनवाडी तलावातला गाळ काढल्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे. या कामामुळे परिसरातील दोनशे पेक्षा जास्त विहिरींना त्याचा फायदा होणार असून सुमारे एक हजार एकर शेती कायमस्वरुपी ओलिताखाली येणार आहे. परिणामी शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.''

यावेळी भारत फोर्ज च्या सीएसआर विभाग प्रमुख लीना देशपांडे,प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, भिगवण गटाचे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सिध्देश्वर निंबोडीच्या सरपंच मनिषा फडतरे, उपसरपंच नितीन विधाते, ग्रामस्थ उपस्थित होते.

शिर्सुफळ मध्येही विकास कामांचे लोकार्पण

दरम्यान शिर्सुफळ (ता.बारामती) येथेही भारत फोर्ज कंपनी, बारामती अॅग्रो, व अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांच्यासाठी बांधून देण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालय युनिटचेही लोकार्पण रोहित पवार यांच्या हस्ते हस्ते पार पडले. यावेळी सरपंच आप्पासाहेब आटोळे, उपसरपंच राजेंद्र आटोळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com