सेनेने पाठिंबा काढल्यास 20 आमदार, 2 मंत्री वर्षावर : रवी राणा 

सेनेने पाठिंबा काढल्यास 20 आमदार, 2 मंत्री वर्षावर : रवी राणा 

मुंबई: शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास शिवसेनेत उभी फूट पडेल असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.

मोदी सरकार तसेच फडणवीसांचा राज्यातील कारभार सामान्य जनतेच्या विरोधातला असल्याने शिवसेनेचे आमदार नाराज आहेत ,सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे घेतील असे प्रवक्‍ते संजय राउत यांनी स्पष्ट केले आहे.

आज या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री समर्थक मानल्या जाणाऱ्या अपक्ष आमदार रवी राणा यांनी सेनेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास दसऱ्याच्या मेळाव्याच्या दिवशीच 2 मंत्री आणि 20 आमदार राजीनामा देवून थेट वर्षांवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे येतील. ही मंडळी भाजपत प्रवेश घेतील असेही राणा आज म्हणाले आहेत.

 मन सत्तेत रमत नसल्याने शिवसेना खरेच बाहेरून समर्थन देणार काय असा प्रश्‍न चर्चेत असतानाच राणा यांनी हे विधान केले आहे.

राणांना  शिवसेनेने सर्व्हेच काम दिलेलं नाही-   रावते 
औरंगाबाद :  "रवि राणा शिवसेनेत नाही की पक्षाने त्यांना कुठले पद दिलेले नाही. मग शिवसेनेचे मंत्री, आमदार भाजपात जाणार हे आरोप ते कुठल्या आधारावर करतायेत'",असा संतप्त सवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केला.

औरंगाबाद येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात दिवाकर रावते यांच्या पत्रकार परिषदेचे आज (ता. 22) आयोजन करण्यात आले होते. परिवहन खात्याशी संबंधित प्रश्‍नोत्तरे झाल्यानंतर पत्रकारांनी रावते यांचे लक्ष आमदार रवि राणा यांनी केलेल्या दाव्याकडे वेधले. 
यावर रवि राणा यांना शिवसेनेने किती मंत्री, आमदार भाजपमध्ये जाणार याच्या सर्व्हेचे काम दिलेले नाही, त्यामुळे त्यांच्या आरोपाला गांभीर्याने घेऊ नका, त्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com