MLA Ravi Rana is eying for Vijay Mill Land : Shivray Kulkarni | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

विजय मिलच्या जागेवर आमदार राणांचा डोळा : भाजप प्रवक्ते कुलकर्णी

सरकारनामा
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

आरोप सिद्ध करून दाखवा- रवि राणा
कोणतेही पुरावे नसताना आरोप करण्यात येत आहेत. हे आरोप बुनबुडाचे आहेत. त्यांचेच सरकार आहे, मंत्री आहेत, त्यांनी चौकशी करावी. ज्यांचे त्यांच्याच पक्षात कोणीच ऐकत नाही, पत नाही, त्यांना असे बोलण्याचा अधिकार तरी आहे काय? असा सवाल आमदार रवी राणा यांनी "सरकारनामा'शी बोलताना केला.

अमरावती :  बडनेरा येथील विजय मिलची जागा हडपण्याचा प्रयत्न आमदार रवी राणा करीत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला.

शिवराय कुलकर्णी हे बडनेरा मतदारसंघातून भाजपचे उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक असून यामुळे या आरोपामागे राजकीय खेळी असल्याचे बोलले जात आहे.

मिलच्या जागेवर चाळीस वर्षांपासून राहणाऱ्या लोकांना स्थायी घरकुलाचे पट्टे देण्याचा शासन निर्णय असून आमदारांनी त्यावर अंमलबजावणी होऊ दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला. शिवराय कुळकर्णी म्हणाले, "बडनेरा येथील विजय मिल कधीकाळी बडनेऱ्याच्या औद्योगिक व रोजगार उत्पन्नाचे मुख्य साधन होते. काळाच्या ओघात   ही मिल बंद पडली व जमीन वस्त्रोद्योग मंडळाने नझूलला हस्तांतरित केली. 2005 मध्ये ही जमीन हडपण्याचे प्रयत्न विविध लोकप्रतिनिधींकडून केले गेलेत. बडनेराचे आमदार रवी राणा यांनी वारंवार बदललेली भूमिका या प्रकारातील आहे. त्यांनी नकली कंपनी स्थापन करून गारमेंट फॅक्‍टरी स्थापण्याच्या नावावर या जमिनीची मागणी केली आहे . "

" त्यावेळी ही जागा औद्योगिक प्रकल्पाकरिता आरक्षित करण्यात आली. ही जागा खासगी संस्थाना देऊ नये, अशी भूमिका घेणारे आमदार राणाच स्वतः या जमिनीवर डोळा ठेवून असून ती बळकावण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.  2007 मध्ये या जागेवर गारमेंट झोन उभारण्यास सरकारने तयारी दर्शविली होती. त्याचवेळी मिल चाळमधील रहिवाशांना जागा देण्यासाठी 40 हजार 22 चौरस मीटर जागा आरक्षित करण्यात आली. मात्र हा निर्णय मुद्दामच रोखण्यात आला आहे , " असा  आरोप श्री . कुलकर्णी यांनी  केला.

 मिलच्या जागेवर शासकीय उद्योग उभारून उर्वरित जागेत प्रती कुटुंब 225 चौरस फूट जागा देण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेतून केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख