गरिबांच्या पोरांनी साहेब व्हायचे स्वप्न बघायचे की नाही? आमदार राम सातपुतेंचा सवाल - MLA Ram Satpute Raises Questions over Mega Employment in Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

गरिबांच्या पोरांनी साहेब व्हायचे स्वप्न बघायचे की नाही? आमदार राम सातपुतेंचा सवाल

संपत मोरे
गुरुवार, 12 मार्च 2020

आमदार राम सातपुते यांनी आपल्या ट्वीटर हँडलवरुन महाराष्ट्र शासनाला काही प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न मेगा भरतीमधल्या त्रुटी दाखवणारे आहेत

पुणे : "गरिबांच्या पोरांनी साहेब व्हायचं स्वप्न बघायचं की नाही? असा सवाल आमदार राम सातपुते यांनी उपस्थित केला आहे.महाराष्ट्र शासनाने मेगाभरती जाहीर केली आहे मात्र ही मेगाभरती खाजगी एजन्सीच्या माध्यमातून होणार असल्याने ही भरती पारदर्शक होणार का?असा सवाल आमदार सातपुते यांनी व्यक्त केला आहे.

सातपुते यांनी आपल्या ट्वीटर हँडलवरुन महाराष्ट्र शासनाला काही प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न या भरतीमधल्या त्रुटी दाखवणारे आहेत."सरकार खाजगी एजन्सीच्या माध्यमातून नोकरी भरती करायला लागलं आहे. पण नोकर भरती एम पी एस सी च्या माध्यमातून झाली पाहिजे. सरकारला वशिलेबाजीला प्रोत्साहन द्यायचं  आहे का?" असा सवाल सातपुते यांनी व्यक्त विचारला आहे.

गरीबाच्या लेकरांनी साहेब व्हायचं स्वप्न बघायचं की नाही." असा भावनिक प्रश्न त्यांनी विचारला आहे. खाजगी एजन्सीच्या माध्यमातून नोकर भरती झाली तर महाराष्ट्रात नोकर भरतीचे घोटाळे होतील, असेही असे आमदार सातपुते यांनी म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख