आमदार राजाभाऊ वाजेंनी केली मजुराच्या मुलीची इंजिनिअरींच्या शिक्षणाची सोय 

गावात मोलमजुरी करणाऱ्या विष्णू झगडे या मजुराची मुलगी स्वातीला प्रवेश परिक्षेत 95 गुण मिळाले. तिला अभियांत्रिकी शाखेत प्रवेशही मिळाला. मात्र वडिलांच्या मजुरीतून मोठ्या अडचणीतून घर चालत असल्याने तिच्याकडे शुल्क भरण्यासाठी पैसेच नव्हते. तिला शिक्षण सोडण्याची वेळ आली होती. या विद्यार्थीनीची हालाखीची स्थिती पाहून आमदार राजाभाऊ वाजे यांनी तिला मदतीचा हात दिल्याने ती महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकली.
आमदार राजाभाऊ वाजेंनी केली मजुराच्या मुलीची इंजिनिअरींच्या शिक्षणाची सोय 

नाशिक : गावात मोलमजुरी करणाऱ्या विष्णू झगडे या मजुराची मुलगी स्वातीला प्रवेश परिक्षेत 95 गुण मिळाले. तिला अभियांत्रिकी शाखेत प्रवेशही मिळाला. मात्र वडिलांच्या मजुरीतून मोठ्या अडचणीतून घर चालत असल्याने तिच्याकडे शुल्क भरण्यासाठी पैसेच नव्हते. तिला शिक्षण सोडण्याची वेळ आली होती. या विद्यार्थीनीची हालाखीची स्थिती पाहून आमदार राजाभाऊ वाजे यांनी तिला मदतीचा हात दिल्याने ती महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकली. 

सिन्नर शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या स्वाती विष्णू झगडे हिने बारावीत चांगले गुण मिळवले. सीईटी परिक्षेत तीला 95 गुण मिळाल्याने गुणवत्तेच्या निकषावर तिला नाशिकच्या मविप्र संस्थेच्या केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षात प्रवेश मिळाला होता. इंजिनिअर होणार म्हणून तिला एकीकडे आनंद होता. दुसरीकडे घरची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने प्रवेश शुल्क भरायचे कसे? कोण मदत करणार? हा यक्षप्रश्‍न तिच्यापुढे होता. 

तिचे वडिल गावातच मोलमजुरी करीत असल्याने मुश्‍कीलीने त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ सुरु होता. घरची मदत अशक्‍य बनल्याने तिच्या प्रवेशाची शक्‍यता जवळपास संपुष्टात आली होती. शेवटची आस म्हणून ती शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांना भेटली. तिची माहिती घेतल्यावर तुला इंजिनिअरींगचा अभ्यास झेपेल का ? अभ्यासाची तयारी आहे का? याची विचारपूस आमदार वाजे यांनी केली. तिची शिकण्याची व अभ्यासाचे कष्ट घेण्याची तयारी लक्षात घेऊन त्यांनी तिला शुल्क भरण्यास मदतीचा हात पुढे केला. पुढच्या शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन अडचण आल्यास संपर्क कर, असे सांगत तिच्या शिक्षणाच्या मार्गातील अडसर दुर केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com