MLA Rahul Patil's four wheeler meets an accident | Sarkarnama

आमदार राहूल पाटील यांच्या स्कॉर्पिओवर खांब कोसळला 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

हा खांब रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या एका स्कॉर्पिओ जीपवर पडला. त्यात जीपचे छत फाटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. परभणीचे शिवसेना आमदार राहूल पाटील यांची ही स्कॉर्पिओ आहे.

 

औरंगाबादः पथदिव्याचा खांब रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या एका स्कॉर्पिओ जीपवर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी (ता. 14) दुपारी सिडको भागात घडली. पोलवरून केबल टाकताना हा प्रकार घडला असून, ही स्कॉर्पिओ परभणीचे शिवसेना आमदार राहुल पाटील यांची आहे. 
 

शहरातील अनेक रस्त्यांवर बेकायदा केबल टाकण्यात येत आहेत. या केबलसाठी रस्त्याच्या मधोमध असलेल्या महापालिकेच्या केबलचा वापर केला जातो. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कॅनॉट गार्डन परिसरात काहीजण केबल ओढत होते. 

या वेळी अधिक जोर लावून ताण दिल्याने पथदिव्याचा खांबच कोसळला. हा खांब रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या एका स्कॉर्पिओ जीपवर पडला. त्यात जीपचे छत फाटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. परभणीचे शिवसेना आमदार राहूल पाटील यांची ही स्कॉर्पिओ आहे. घटनेच्या वेळी गाडीत कुणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

संबंधित लेख