mla rahul kul on sarkarnama facebook live | Sarkarnama

आमदार राहुल कुल दोन नोव्हेंबरला सकाळी ११.३० ला सरकारनामा `फेसबुक लाइव्ह`वर 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

महाराष्ट्रातील नेत्यांचं चाललंय काय?, काय आहेत त्यांच्या २०१९ साठीच्या योजना, त्यांच चोवीस तासाचं राजकारण कसं चालतं, याबाबत अनेकांना उत्सुकता असते. सरकारनामा घेऊन येतयं खास नेत्यांच्या मुलाखती फेसबुक लाइव्हवर. पाहायला विसरू नका. दोन नोव्हेंबर रोजी भेटा आमदार राहुल कुल यांना

पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहूल कुल यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेणारा "सरकारनामा'चा "फेसबुक लाईव्ह' कार्यक्रम उद्या सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. फेसबुकच्या माध्यमातून आमदार कुल यांची मुलाखत "सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस घेणार आहेत. 

आमदार कुल हे राज्यातील एक तरूण नेते आहेत. नवी उमेद, नव्या स्वप्नांच्या माध्यमातून नव महाराष्ट्राच्या निर्मितीची युवकांची स्वप्ने जाणून घेण्यासाठी आमदार कुल यांच्याशी संवादाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्राची सद्य राजकीय स्थिती, सामाजिक आंदोलने, आरक्षण, महागाई, युवकांपुढील आव्हाने तसेच राज्यापुढील दुष्काळासारखा महत्वाच्या प्रश्नांवर आमदार कुल यांच्याशी मुक्त संवाद होणार आहे. उद्या सकाळी साडेअकरा वाजता ही लाईव्ह मुलाखत पाहता येणार आहे. सरकारनामा फेसबुक पेजवर ही मुलाखत नंतरही पाहण्यासाठी उपलब्ध असेल.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख