अपघातग्रस्तांना काढण्यासाठी आमदार राहुल आहेर विहिरीत उतरले

नाशिकजवळ एस.टी. बस आणि रिक्षाचा अपघात घेऊन ही वाहने थेट विहिरीत कोसळली. त्यावेळी आमदारडॉ. राहुल आहेर घटनास्थळी पोहोचल्यावर थेट मदतकार्यात व्यग्र झाले. एव्हढेच नव्हे तर विहिरीत उतरुन त्यांनी मदतकार्यही केले
MLA Rahul Aher Went into the Well to Help Accident Victims
MLA Rahul Aher Went into the Well to Help Accident Victims

देवळा : नाशिकजवळ एस.टी. बस आणि रिक्षाचा अपघात घेऊन ही वाहने थेट विहिरीत कोसळली. त्यात सव्वीस जण ठार तर 35 जखमी झाले. जखमी तसेच मृतांना विहिरीत काढणे एक कठीण मदतकार्य होते. सबंध राज्यात या धक्कादायक अपघाताची चर्चा परली. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर घटनास्थळी पोहोचल्यावर थेट मदतकार्यात व्यग्र झाले. एव्हढेच नव्हे तर विहिरीत उतरुन त्यांनी मदतकार्यही केले. 

देवळ्यातील धोबीघाट वळणावर मंगळवारी बस व रिक्षाचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता, की विहिरीचे कठडे तोडून दोन्ही वाहने थेट विहिरीत पडली. बसचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघाताची तीव्रता एव्हढी होती की घटनास्थळी विहिरीत अडकलेल्या बसमधून जखमींच्या किंचाळ्या येत होत्या. घटनेची माहिती मिळताच आमदार राहुल आहेर, तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, पोलिस निरीक्षक सुहास देशमुख, आपत्ती निवारण दल घटनास्थळी दाखल झाले. या वेळी नागरिकांचीही मोठी गर्दी झाल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले.

यावेळी बस विहिरीतून काढण्यासाठी तीन क्रेन आल्या होत्या. या क्रेनच्या मदतीने विहिरीतील बसमध्ये उतरुन जखमी व मृतदेह काढले जात आहेत. विहिरीत पाणी असल्याने हे सगळेच धोकादायक होते. मात्र, आमदार आहेर यांनी केवळ अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना न देता ते थेट विहिरीत उतरुन बसवर गेले. थेट मदतकार्यात सहभागी झाले. सुमारे दोन तास ते येथे काम करीत होते. 

त्यानंतर त्यांनी देवळा, मालेगाव, उमराने येथील रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस करीत उपचाराची माहिती घेतली. ते स्वतः अस्थिरोगतज्ञ असल्याने त्याची येथील डॉक्‍टरांनाही मदत झाली. मृताच्या नातेवाईकांना धीर देतांना विविध यंत्रणांकडून त्यांनी मदत उपलब्ध केली. मंगळवारी झालेल्या या अपघाताने परिसरात सगळीकडे शोक होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com