भाजपच्या बैठकीस आमदार परिचारकांची दांडी

Prashant paricharak skips BJP meeting
Prashant paricharak skips BJP meeting

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा ही विधानसभेची जागा भाजपच्या 'कमळ' चिन्हावर कोणत्याही उमेदवारास लढविण्यासाठी दिली जावी, असा एकमुखी ठराव शुक्रवारी येथे झालेल्या शहर भाजपच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

 या बैठकीस भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक, त्यांच्या गटाचे कोणीही प्रमुख नेते उपस्थित नव्हते. मात्र, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, डॉ. बी. पी. रोंगे हे प्रमुख नेते उपस्थित होते.  

बैठकीला भाजप नेते कल्याणराव काळे, डॉ. बी. पी. रोंगे, माजी जिल्हाध्यक्ष काशिनाथ थिटे-पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल, सरचिटणीस शंतनू दंडवते, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशराव खिस्ते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्या बदल्यात पक्षालाही काहीतरी देणे लागते, ही भूमिका डोळ्यासमोर धरून पंढरपूर शहर भाजपने ही जागा 'अधिकृत कमळासाठी' भाजपच्या अधिकृत कोणत्याही उमेदवाराला द्यावी. आम्ही ती तन, मन, धन लावून विजयी करू, असा विश्‍वास वाईकर यांनी बोलताना व्यक्त केला. 

श्री. काळे, श्री. रोंगे, श्री. थिटे, तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल, शहर सरचिटणीस शंतनू दंडवते, वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ. शशिकांत धायतडक, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश खिस्ते, कार्यालय प्रमुख आनंद नगरकर आदींनी ठरावाला पाठिंबा देत मनोगते व्यक्त केली.

या वेळी नगरसेविका शकुंतला नडगिरे, बाबा बडवे, रेखा कुलकर्णी, अपर्णा तारके, अधटराव, लखन ननवरे, नितीन करंडे, देवयानी दामोदरे, अशपाक नदाफ, डॉ. शशिकांत धायतडक यांच्यासह भाजपचे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. सुरेंद्र कवठेकर यांनी सूत्रसंचालन केले. आनंद नगरकर यांनी आभार मानले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com