आमदार बंब यांनी कार्यकर्त्यांना विचारले,कोणता झेंडा घेऊ हाती ?

..
prashant-bamb
prashant-bamb

खुलताबाद  : गंगापुर- खुलताबाद विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीवरुन विधानसभेचे गणित बदलण्याची चिन्हे असुन विद्यमान आमदार प्रशांत बंब यांनी नुकतीच दोन्ही तालुक्‍यातील मोजक्‍याच कार्यकर्त्यांशी औरंगाबादेत एकांतात चर्चा केली. या वेळी चर्चा करतांना कोणता झेंडा घेऊ हाती अशी विचारणा प्रशांत बंब यांनी केली असल्याचे वृत्त आहे . 

त्यातच शिवसेना प्रमुख उध्द्‌ व ठाकरे यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील लासुर स्टेशनच्या कार्यक्रमात केलेल्या कान गोष्टीमुळे चर्चेला उधाण आले,सोशल मिडीयावरही याबाबत जोरदार चर्चाही सुरु आहे.

गंगापुर - खुलताबाद विधानसभा मतदार संघातील दोन्ही पंचायत समित्या,नगरपरिषद, जि.प.चे गट शिवसेना- भाजपच्या ताब्यात आहेत . पण  लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती असूनही खैरे येथून साडेचार हजार मतांनी पिछाडीवर होते . हर्षवर्धन जाधव यांचे मराठा फॅक्‍टरचे ट्रॅक्‍टर ६४ हजार मते आपल्या ट्रॉलीत घेऊन गेले . अन वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांना तब्ब्ल ५६ हजार मते पडली . विधानसभा निवडणुकीतही या मतदारसंघात वंचित आघाडी आणि हर्षवर्धन जाधव यांचा प्रभाव राहणार आहे . 

लोकसभा मतदानाची ही आकडेवारी समीकरणे बदलण्यासाठी पुरेशी असल्यानेच भाजपचे विद्यमान आमदार बंब यांना विचार करण्यास भाग पाडते आहे. त्याचाच भाग म्हणुन विधानसभा मतदारसंघातील दोन्ही तालुक्‍यातील पक्ष पदाधिकारयांसह,लोक प्रतिनिधींशी गुफ्तगु करुन चाचपणी सुरु केली आहे.

या मतदार संघात गेली 10 वर्षे सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला  जमविणारया आमदार बंब यांचे गणित  यंदा माञ वंचित आघाडी आणि मराठा फॅक्टरमुळे जमेनासे झाले आहे .

त्यामुळे भाजप  पक्षाकडुन लढावे की,शिवसेनेकडुन की अपक्षच लढावे  या सर्व बाजूंवर  कार्यकर्त्यांची मते जाणुन पुढील रणनितीबाबतचा विचार सुरु आहे.  विधानसभा निवडणुक अवघ्या तीन महिन्यांवर   येवुन ठेपली आहे .  तालुक्‍यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याही बैठकीचे सञ सुरु झाले असुन,ग्रामीण कार्यकर्त्यांना चार्जिग करण्यात येत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com