आमदार प्रणिती शिंदे हाजीर हो sss

2 जानेवारी 2018 रोजी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून पालकमंत्र्यांच्या गाडीला घेराव घातला होता. या वेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना धक्‍काबुक्की केली होती.
pranitee_shinde summoned
pranitee_shinde summoned

सोलापूर : शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणात कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि महापालिकेतील गटनेते चेतन नरोटे यांना 3 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर होण्याबाबत जामिनपात्र वॉरंट बजाविण्यात आले आहे. 

दरम्यान, या प्रकरणात माजी आमदार प्रकाश यलगुलवार, कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, बाबा करगुळे, केशव इंगळे, राहुल वर्धा, बशीर शेख, करिम शेख आदींना बुधवारपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 29 ऑगस्ट रोजी सरकारी पक्षाचे म्हणणे मागविले आहे. यात आरोपीतर्फे ऍड. प्रवीण शेंडे, ऍड. अमित आळंगे, ऍड. भीमाशंकर कत्ते, ऍड. एस. एस. कालेकर हे काम पाहात आहेत.

 कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून पालकमंत्र्यांच्या गाडीला घेराव घातला होता. या वेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना धक्‍काबुक्की केली होती. ही घटना 2 जानेवारी 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी घडली होती. या प्रकरणात कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांवर सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण आणल्याचा गुन्हा सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. 

या प्रकरणात सर्व आरोपी 26 ऑगस्ट रोजी न्यायालयामध्ये हजर झाले होते. न्यायालयाने सुरवातीस सर्वांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर दोन दिवसाकरिता अंतरीम जामीन दिला आहे. तर आमदार प्रणिती शिंदे आणि गटनेते चेतन नरोटे यांना 3 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविले आहेत, असे ऍड. अमीत आळंगे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com