mla prakash aabitkar criticise chandrakant patil | Sarkarnama

आंदोलन भडकावे ही चंद्रकांत पाटलांची इच्छा : प्रकाश आबिटकर 

सदानंद पाटील 
गुरुवार, 26 जुलै 2018

राज्यभर मराठा समाजाचा आरक्षणासाठी आक्रोश सुरू आहे. अशा काळात आंदोलनकर्त्याबरोबर चर्चा करण्याचे सोडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आंदोलन चिघळवणारी भाषा करत आहेत, अशी टीका राधानगरी भुदरगडचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली. 

कोल्हापूर : राज्यभर मराठा समाजाचा आरक्षणासाठी आक्रोश सुरू आहे. अशा काळात आंदोलनकर्त्याबरोबर चर्चा करण्याचे सोडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आंदोलन चिघळवणारी भाषा करत आहेत, अशी टीका राधानगरी भुदरगडचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली. 

आमदार आबिटकर म्हणाले, राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. तो रस्त्यावर उतरला आहे. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने हालचाल करणे आवश्‍यक होते. या सर्व प्रक्रियेत मुख्यमंत्र्यांपेक्षा मंत्री पाटील यांच्यावर अधिक विश्वास असल्यानेच त्यांच्याकडे या समितीचे अध्यक्षपद आहे. मराठा समाज अधिक आक्रमक असताना मंत्री पाटील यांनी आंदोलन कर्त्यांसोबत चर्चा करणे आवश्‍यक होते. मात्र तसे न करता हे आंदोलन अधिक भडकेल, अशी विधाने मंत्री पाटील करत आहेत, हे योग्य नसल्याचे आमदार आबिटकर म्हणाले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख