राहुल शहांनी परिचारक गटाला समर्थन दिल्याने आमदार भालके गटाला धक्का

विधानसभेच्या तोंडावर पंढरपूर व मंगळवेढ्यातील राजकारण निर्णायक वळणावर असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक मंगळवेढ्यातील रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांनी यांनी आपल्या गटाचे समर्थन विधानपरिषदेचे प्रशांत परिचारक गटाला दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार भारत भालके गटाला धक्का बसला आहे.
MLA Prashant Paricharak Faction Melava
MLA Prashant Paricharak Faction Melava

मंगळवेढा : विधानसभेच्या तोंडावर  पंढरपूर व मंगळवेढ्यातील राजकारण निर्णायक वळणावर असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक  मंगळवेढ्यातील रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा  यांनी यांनी आपल्या गटाचे समर्थन विधानपरिषदेचे प्रशांत परिचारक गटाला दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार भारत भालके गटाला धक्का बसला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाजनादेश यात्रा सुरू आहे. या यात्रेचा समारोप सोलापूर येथे होत आहे. त्या अनुषंगाने आ. प्रशांत परिचारक कारखान्याच्या कार्यस्थळावर परिचारक गटाच्या वतीने  स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यामध्ये मा.आमदार सुधाकर  परिचारक, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अजित जगताप शशिकांत चव्हाण गौरीशंकर बुरकूल राजेंद्र सुरवसे अरूण किल्लेदार जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर युन्नुस शेख, चंद्रशेखर कौडुभैरी , शिवाजीराव नागणे शिवानंद पाटील, चरणूकाका पाटील, बबलू सुतार, मधुकर चव्हाण, माधवानंद आकळे, सचिन चौगुले  यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे आजच्या बैठकीतून काय निर्णय होतो याकडे तालुक्यातील राजकीय निरीक्षकांचे लागले होते.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पूर्वीपासून शरद पवार यांचे शहा कुटुंबियांचे संबंध असून राष्ट्रवादीला होत असलेल्या गळती बद्दल राजकीय पटलावर चर्चा होत असताना मंगळवेढ्यात त्या पद्धतीची चर्चा सुरू झाली. शहरातील राजकारणावर  स्व. रतनचंद शहा यांच्यापासून पकड असून त्यांच्या पश्चात स्वर्गीय सुभाष शहा आणि आता स्वतः राहुल शहा यांच्याकडे शहरातील राजकारणाची सूत्रे आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सत्ता असताना नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या वर्चस्व स्थापनेत त्यांनी योगदान देत राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष  केला. शिवाय रतनचंद शहा बँकेच्या माध्यमातून शहरातील राजकारणावर पकड आहे. 

परंतु अलीकडच्या काळात नगरपालिकेच्या विकास कामांमध्ये त्यांना अपेक्षित सहकार्य होत नसल्यामुळे त्यांनी आज आता तालुक्यातील वाढती बेरोजगारी व विकासाच्या दृष्टीने परिचारक गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आ. परिचारक गटाचे समर्थन केल्यामुळे आ.भालके गटाला अडचणीचे  ठरणारे आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com