`दिसतोय फरक` सांगत आमदार पाचर्णे यांनी फुंकले रणशिंग!

`दिसतोय फरक` सांगत आमदार पाचर्णे यांनी फुंकले रणशिंग!

शिक्रापूर : विधानसभा निवडणुकीचे वेध राज्याला लागले असतानाच गेल्या पाच वर्षांत शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांच्या कामकाजाचा साठ पानी संपूर्ण कार्यवृतांत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हाती सोपवत आमदार बाबूराव पाचर्णे यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे रणशिंग  फुंकले.

विधानसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार अद्याप ठरायचे आहेत. शिरूरमध्ये भाजप नव्या चेहऱ्याला उमेदवारी देणार की पाचर्णे यांना पुन्हा संधी देणार, याबाबत अनेकदा चर्चा सुरू असते. तसेच इतर पक्षांतील कोणी नेता भाजपमध्ये येऊन पाचर्णे यांचा पत्ता कट करणार, अशीही शंका व्यक्त केली जाते. मात्र आपल्या अहवालाचे प्रकाशन करून पाचर्णे यांनी आपणच पुन्हा शिरूरमधून भाजपचे उमेदवार असल्याचा संदेश या निमित्ताने दिला आहे. 

पाचर्णे यांनी सन २०१४ पासून ते आजपर्यंतची सर्व केलेली कामे, सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न, शासनाचे बडे प्रकल्प ते प्रत्येक छोट्या-मोठ्या गावातील सर्व प्रश्न आणि त्यावर त्यांनी केलेली कार्यवाही या अहवालात मांडण्यात आली आहेत. त्याचे प्रकाशन मंगळवारी  मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजीराव भुजबळ, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील फराटे, अजिंक्य कांचन,  उद्योजक राजेश लांडे, कामगार नेते संतोष पाचुंदकर, जयेश शिंदे, राजेंद्र चव्हाण आदींच्या उपस्थितील या कार्यअहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. 

’दिसतोय फरक! आमदर पाचर्णे परत!!’ चेही कौतुक
कार्यअहवालात अनेक ठिकाणी सन २०१४ पूर्वीचे मतदारसंघातील रस्ते आणि नव्याने झालेले रस्ते तसेच अनेक विकासकामांची पूर्वीची स्थिती आणि गेल्या पाच वर्षांतील कामकाजानंतरची स्थिती अशी अनेक उदाहरणे अहवालात समाविष्ट केलेली आहेत. या प्रत्येक उदाहरणाच्या ठिकाणी ’दिसतोय फरक आमदार पाचार्णे परत’ असे मथळे लिहीले आहेत. याच मथळ्यांचे कौतुकही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. ’व्वा बाबुरावजी वा! पाच वर्षात चांगली कामे केलीत,’ असे म्हणत उपस्थितांपुढे मुख्यमंत्र्यांनीही पाचर्णे यांचे जाहीर कौतुक यावेळी केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com