आमदार नितीन पवारांचा मुलगा म्हणतो; "आम्हाला वडिलांची काळजी वाटते'

...
आमदार नितीन पवारांचा मुलगा म्हणतो; "आम्हाला वडिलांची काळजी वाटते'

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बेपत्ता असलेल्या पाच आमदारांत नाशिकचे नितीन पाटील आहेत. त्यांचा दुरध्वनी नॉट रिचेबल आहे. त्यामुळे दिवसभर त्यांचा संपर्क होत नसल्याने त्यांनी काल मध्यरात्री येथील पंचवटी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांची काळजी वाटते म्हणुन तक्रार केल्याचे म्हटले आहे.

भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवार यांच्या भूमिकेपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसने फारकत घेतली. यावेळी नितीन पाटील मुंबईकडे निघाले होते. त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सावध भूमिका घेत "अद्याप काहीच ठरवलेले नाही. पक्षाची भूमिका समजल्यावर ठरवू' असे "सरकारनामा' प्रतिनिधीला सांगितले होते. त्यानंतर दुपारी अडीचला नवी दिल्लीसाठी खासगी चार्टर विमानासाठी नऊ आमदारांच्या यादीत त्यांचे नाव होते. त्यामुळे आमदार नितीन पवार यांची भूमिका `नरो वा कुंजरो वा` असल्याचा संशय येत होता. सध्या गुजरातला हलवलेल्या पाच आमदारांत त्यांचे नाव असल्याचा संशय आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचा तिढा कायम आहे. या घटनाक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही आमदार नॉट रीचेबल आहेत. शनिवारी रात्री साडे दहाला कळवण विधानसभा मंतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित आमदार नितीन पवार हे सकाळी सर्वसाधारण सकाळी साडे सहा वाजेपासू घरातुन गेले होते. ते गेल्यापासून त्यांचा दूरध्वनीवर संपर्क होत नव्हता. त्यामुळे आमदार पवार यांचे पुत्र ऋषिकेश नितीन पवार यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आमदार पवार माजी राज्यमंत्री (कै) ए. टी. पवार यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com