MLA Nitesh Rane refuses to give one month salary to Congress party | Sarkarnama

एक  महिन्याचे वेतन देण्यास आ. नितेश राणेंचा नकार

संदीप खांडगेपाटील
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नारायण राणे व नितेश राणे यांच्या अहमदाबाद वारीवरून राजकीय वर्तुळात निर्माण झालेले वादळ अद्यापि शमलेले नाही तोच आ. नितेश राणे यांनी आमदारांचे वेतन प्रकरणी विरोध दर्शवित राणे परिवाराची काँग्रेसवर असलेली नाराजी पुन्हा एकवार दाखवून दिली आहे

मुंबई : राणे परिवारावरील काँग्रेसची नाराजी दिवसेंगणिक वाढतच चालली आहे. पक्षाने काँग्रेसच्या आमदारांना एक  महिन्याचे वेतन पक्षाला देण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसचेच आमदार नितेश राणे यांनी विरोध दर्शविला आहे. प्रदेश अध्यक्षांच्या प्रस्तावाला विरोध करत नितेश राणेंनी अशोक चव्हाणांना ‘घरचा आहेर’ दिला आहे.

नारायण राणे व नितेश राणे यांच्या अहमदाबाद वारीवरून राजकीय वर्तुळात निर्माण झालेले वादळ अद्यापि शमलेले नाही तोच आ. नितेश राणे यांनी आमदारांचे वेतन प्रकरणी विरोध दर्शवित राणे परिवाराची काँग्रेसवर असलेली नाराजी पुन्हा एकवार दाखवून दिली आहे.
काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणूकांमधील काँग्रेस पक्षाच्या अपयशाचे खापर प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर फोडत त्यांच्या नेतृत्व क्षमतेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. त्यापाठोपाठ नारायण राणेंच्या अहमदावादेतील भेट प्रकरणावरून राजकीय क्षेत्रात गदारोळ निर्माण झाला होता.

काँग्रेस पक्षसंघटनेचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन पक्षसंघटनेत जमा करण्याचा प्रस्ताव काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मांडला. यावर सर्वप्रथम काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी कडाडून विरोध आम्ही विधानसभेच्या निवडणूका आमच्या हिमंतीवर लढता असे सांगत त्यांनी आपले वेतन देण्यास नकार दिला आहे.
राज्यामध्ये 60 वर्षे सत्ता भोगलेल्या काँग्रेसच्या आर्थिक परिस्थितीबाबतही आमदार नितेश राणे यांनी प्रश्‍नचिन्ह करत आपल्याला पक्षासाठी योगदान द्यायला जमत नाही म्हणून आमदारांकडे एक महिन्याच वेतन का मागता ? असा थेट सवालही नितेश राणेंचा अशोक चव्हाणांना विचारला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख