`तिकिटाचा काय संबंध? रश्मी बागल कारखाने वाचविण्यासाठी शिवसेनेत`

`तिकिटाचा काय संबंध? रश्मी बागल कारखाने वाचविण्यासाठी शिवसेनेत`

करमाळा :  रश्मी बागल या शिवसेनेच्या आगामी निवडणुकीत आपण उमेदवार असल्याचे सांगत असल्या तरी तसे काही नाही, असा दावा शिवसेनेचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी `सरकारनामा`शी बोलताना केला.

बागलांच्या ताब्यात आदिनाथ व मकाई या दोन्ही कारखान्यावर कोट्यावधीचे कर्ज आहे. कामगारांचे तीन वर्षांचे पगार थकले आहेत. हे कारखाने वाचवण्यासाठी रश्मी बागल शिवसेनेत आल्या आहेत. सध्या बागल शिवसेनेचे तिकीट मिळणार असल्याचे सांगत आहेत. मी लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुढील भूमिका मी जाहीर करेन, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रश्मी बागल उद्या (मंगळवार) `मातोश्री`वर शिवसनेत प्रवेश करणार आहेत. यावर प्रतिक्रिया विचारली असता आमदार नारायण पाटील बोलत होते. 

याबाबत अधिक माहिती देताना आमदार पाटील म्हणाले की मला पक्ष डावलणार नाही. मी शिवसेनेचा विद्यमान आमदार असुन माझे काम चागंले आहे. लोकसभेच्या 2014 व 2019 च्या निवडणुकीत युतीच्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम करून मताधिक्य दिले आहे.

``करमाळ्यात शिवसेनेचा आमदार झाल्यानंतर करमाळ्याच्या इतिहासात पहील्यांदा पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा पडकवला. जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील पाच सदस्या की चार सदस्य करमाळ्यातुन आपण निवडुन आणले. हे करत असताना मी स्थानिक पातळीवर मोहिते पाटील व जगताप यांची मदत घेतली असली तरी सर्व निवडणुका धनुष्यबाणावर लढवल्या आहेत. बागलांनी कारखान्यांचे वाटोळे केले आहे. त्यामुळे ते जनतेसमोर जाऊ शकत नाहीत. म्हणुन सत्ताधारी पक्षात जाऊन बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com