अखेर करमाळ्याचे सेना पदाधिकारी बोलले! म्हणाले, नारायणआबाच!
अखेर करमाळ्याचे सेना पदाधिकारी बोलले! म्हणाले, नारायणआबाच!

अखेर करमाळ्याचे सेना पदाधिकारी बोलले! म्हणाले, नारायणआबाच!

आमदार नारायण पाटील यांचा प्रमाणिकपणा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पाहिला आहे. रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला असाला तरी बागल कसे आहेत हे सर्वांना माहीती आहे त्यामुळे शिवसेनेचे तिकीट आमदार नारायण पाटील यांनाच मिळणार आहे, असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.

करमाळा  (जि. सोलापूर) : शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी पाच वर्षात तालुक्याचा विकास तर केलाच आहे, याशिवाय पंचायत समितीवर शिवसेना भगवाही फडकवला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे शिवसेनेचे करमाळ्याचे शिवसेनेचे तिकीट आमदार नारायण पाटील यांनाच देतील, असा विश्वास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जेऊर येथे कार्यक्रम झाला. यावेळी तालुका प्रमुख सुधाकर लावंड, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश चिवटे, शहरप्रमुख प्रविण कटारिया या तिन्ही पदाधिकाऱ्यांनी आमदार नारायण पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहणार असल्याचे सांगितले. 
यावेळी स्वामी आनंदयोगी महाराज, गोविंदबापु पाटील, आमदार नारायण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रश्मी बागल यांनी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. रश्मी बागल यांना शिवसेनेच्या तिकीटाचा शब्द दिल्यानेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले जात असताना करमाळा तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिका-यांनी आमदार नारायण पाटील यांच्या बाजुने ठामपणे भुमीका घेतल्याचे दिसून आले. 

बागल यांच्या शिवसेना प्रवेशानंतर कुठलीही प्रतिक्रिया न देण्याऱ्या सेना पदाधिकाऱ्यांनी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाटील यांची बाजु घेतल्याने आता पुढे काय होणार, यांची मोठी उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com