mla narayan patil about madha result | Sarkarnama

माळशिरसमध्ये निंबाळकरांना १ लाखाचे लिड मिळेल!

संपत मोरे 
सोमवार, 13 मे 2019

करमाळा मतदारसंघात आम्ही चांगला प्रचार केला. लोकांचा चांगला प्रतिसाद होता.

पुणे: "माढा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर शंभर टक्के निवडून येणार आहेत. त्यांना माण-खटाव आणि माळशिरसमध्ये मोठी आघाडी मिळेल,"असा विश्वास करमाळा मतदारसंघातील शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केला. 

पाटील म्हणाले, "शिवसेना भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी या मतदारसंघात चांगली मेहनत घेतली आहे. त्याचे नक्की फळ मिळेल. करमाळा मतदारसंघात आम्ही चांगला प्रचार केला. लोकांचा चांगला प्रतिसाद होता. माढा मतदारसंघातील माळशिरस, माण  खटाव मतदारसंघात नाईक निंबाळकर यांना मोठी आघाडी मिळेल. माळशिरसमध्ये १ लाखाचे तर माण खटाव मतदारसंघात ५० हजारांचे लीड मिळेल."

"निवडणुकीच्या दरम्यान काही नेत्यांचे भाजप प्रवेश झाले. त्याचाही फायदा भाजपचे मताधिक्य वाढण्यात होईल.सर्वच विधानसभा मतदारसंघात लोकांनी भाजपला भरभरून मते दिली आहेत त्यामुळे शंभर टक्के नाईक निंबाळकर विजयी होणार आहेत," असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख

टॅग्स