दिल्लीहून सुटका गाजवलेल्या आमदार झिरवळांना आता नवी जबाबदारी

...
narhari zirwal
narhari zirwal

मुंबई : विधानसभेच्या उपाध्यक्षपदी याच अधिवेशनात नेमणूक करण्याचे महाविकास आघाडीने ठरविले असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे पद गेल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांना संधी मिळणार आहे. या नावासाठी दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांचे नाव आघाडीवर आहे.

राज्यात विधानसभेचे अध्यक्षपद काॅंग्रेसकडे आहे. नाना पटोले हे अध्यक्ष आहेत. विधान परिषदेचे सभापतीपद हे राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे असून रामराजे निंबाळकर या पदावर आहेत. विधान परिषदेचे उपसभापतीपद शिवसेनेकडे असून तेथे नीलम गोऱ्हे यांच्याकडे ते पद आहे.

त्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्षपद नरहरी झिरवळ यांना देण्यात येणार आहे. झिरवळ यांची आमदारकीची तिसरी टर्म आहे. झिरवळ हे अजित पवार यांनी पहाटे घेतलेल्या उपमुख्यमंत्रपदाच्या शपथविधीच्या वेळी गाजले होते. झिरवळ यांना भाजपच्या मंडळींनी दिल्ली जवळील नोएडा परिसरातील हाॅटेलमध्ये ठेवले होते. तेथून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची सुटका केली होती. त्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीसोबत आले होते. त्यांचे दिल्लीला जाणे आणि तेथून परत येणे हा मोठा चर्चेचा विषय झाला होता.  डोक्यावर गांधी टोपी घालत असलेल्या आमदारांची संख्या दुर्मिळ आहे. यात झिरवळ हे उठून दिसतात.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com