रोज दीड तास व्यायाम आणि पूर्णत: शाकाहारी : आमदार मुळीकांचा फिटनेस फंडा

रोज दीड तास व्यायाम आणि पूर्णत: शाकाहारी : आमदार मुळीकांचा फिटनेस फंडा

पुणे : वडगाव शेरीची तरुण आमदार म्हणून जगदीश मुळीक तरुणांत फेमस आहेत. न सुटलेले पोट, सतत हसतमुख चेहरा, पुढाऱ्यासारखा टिपिकल पोषाख न ठेवता फॅशनबाज पेहराव करणारे आमदार म्हणून मुळीक ओळखले जातात. त्यांच्या फिटनेसचे रहस्य त्यांच्याच शब्दांत


मी रोज सकाळी सुमारे सात किलोमीटर चालतो. एक तास चालून झाल्यानंतर प्राणायाम करतो. रोज एकूण दीड तास व्यायाम होतो. पूर्णत: शाकाहारी आहे. जेवणाच्या वेळा पाळण्यावर माझा भर असतो. शक्‍यतो बाहेरचे खाणे पूर्णपणे टाळतो. समतोल आहार आणि व्यसनापासून पूर्ण अलिप्त यामुळे राजकारणात राहूनही संपूर्णपणे तणावमुक्त राहून "फिटनेस' पाळणे शक्‍य होते. 

पुण्याबाहेर असेल तरच व्यायामाला खंड पडतो. मात्र पुण्यात असताना रविवारीदेखील व्यायामाला सुटी घेत नाही. एक तास चालण्याचा व्यायाम त्यानंतर प्राणायाम असा रोज दीड तास व्यायाम करतोच. सकाळी साधारण साडेसहा वाजता दिवसाची सुरवात होते. दूध पिऊन चालायला जातो. सकाळी नऊ वाजता पोळी-भाजीचे जेवण करतो. त्यासोबत उपीट, इडली-सांबर या प्रकारचे पदार्थ आलटून-पालूटून खातो. त्यानंतर दुपारी दोन-अडीच वाजण्याच्या सुमारास जेवण करतो. सायंकाळी पाचच्या सुमारास नाश्‍ता करतो. रात्री कमी प्रमाणात हलके जेवण घेतो. गेल्या अनेक वर्षापासून माझा हा दिनक्रम आहे.

पुण्यात असताना बाहेरचे जेवण घेतच नाही. अधिवेशनानिमत्त मुंबई किंवा नागपूरला तसेच इतर कामानिमित्त बाहेगावी गेलो तरीही बाहेरचे अन्न कमीत कमी खाण्याचा प्रयत्न मी करीत असतो. दुपारची झोप घेत नाही. राजकारणात असल्याने दुपारच्या झोपेला वेळ नसतोच. मात्र सुरवातीपासून दुपारी झोपण्याची सवय नाही. त्यामुळे तो प्रश्‍न येत नाही. रात्री पुरेशी झोप घेतो. स्वयंशिस्त असली आणि आपली तब्बेत चांगली राहावी, अशी प्रामाणिक इच्छा असली की राजकारणात काय कोणत्याही क्षेत्रात असलो तरी फिटेनेस राखता येतो.  त्यासाठी केवळ इच्छाशक्तीची गरज आहे. थोडक्‍यात तब्बेत चांगली ठेवण्यासाठी फार काही करण्याची गरज पडत नाही. केवळ व्यायामाची शिस्त व खाण्यावर नियंत्रण या गोष्टी पुरेशा आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com