वडगाव शेरीत भाजपचे फक्त पाच इच्छुक : आमदार मुळीक म्हणातात, `नो टेन्शन`

वडगाव शेरीत भाजपचे फक्त पाच इच्छुक : आमदार मुळीक म्हणातात, `नो टेन्शन`

पुणे : वडगाव शेरी विधासभा मतदारसंघातील विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांना आमदारकीसाठी फारसे प्रतिस्पर्धी नसल्याचे आज भाजपने घेतलेल्या मुलाखतीवरून स्पष्ट झाले आहे. आमदार मुळीक यांच्यासह केवळ पाच इच्छुक मुलाखतीसाठी होते. त्यातही त्यांच्याच काही समर्थकांचा समावेश होता.

पुण्यातील इतर मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारीसाठी चुरस असताना मुळीकांसाठी मात्र भाजपमधून कोणी तगडा प्रतिस्पर्धी नसल्याचे दिसून येत आहे. शिक्षणमंत्री आशिष शेलार व इतर नेत्यांनी इच्छुकांशी संवाद साधला. पुण्यातून सर्वाधिक 32 इच्छुक हे शिवाजीनगरमध्ये व सर्वात कमी इच्छुकांची संख्या ही वडगाव शेरीत दिसून आली. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून खासदार बापट यांना 57 हजार मतांचे अधिक्‍य मिळाले होते. त्यामुळे मुळीक यांचे स्थान भक्कम झाल्याचे मानले जात आहे. त्यातच आजच्या मुलाखतीला फारसे कुणी इच्छुक आले नाहीत.

वडगाव शेरी या मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पारंपरिक वर्चस्व होते. बापू पठारे यांचा या परिसरात दबदबा होता. मात्र, पठारे यांची एकाधिकारीशाही मोडीत काढत गेल्या निवडणुकीत मुळीक यांनी बाजी मारली. त्यानंतर महापालिका निवडणुकीतही भाजपचा वरचष्मा राहिला.  लोकसभा निवडणुकीतही मताधिक्‍य गेल्यावेळीपेक्षा वाढत गेल्याने मुळीक यांच्यासाठी तो बोनस ठरला. त्यामुळेच ते उमेदवारीबात `नो टेन्शन` म्हणत आहेत.

वडगाव शेरी मतदारसंघातील इच्छुक

जगदीश मुळीक 
राजेश लोकरे 
महेंद्र गलांडे 
उषा बाजपेयी 
संजय पवार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com