आजचा वाढदिवस : सिद्धराम म्हेत्रे, अक्कलकोट (सोलापूर) - mla mehtre solapur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : सिद्धराम म्हेत्रे, अक्कलकोट (सोलापूर)

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 एप्रिल 2018

सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे दिग्गज आणि जिल्ह्याच्या राजकारणातील किंगमेकर नेते म्हणून अक्कलकोट आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची ओळख आहे. 1997 च्या पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर म्हेत्रे यांचा महाराष्ट्र विधानसभेत पहिल्यांदा प्रवेश झाला. 2009 चा अपवाद वगळता म्हेत्रे यांच्याकडे आमदारकी कायम राहिली आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष, गृह राज्यमंत्री म्हणूनही आमदार म्हेत्रे यांनी काम पाहिले आहे. अक्कलकोट तालुक्‍यातील कुरनूर धरण, तालुक्‍यातील साखर कारखाने, अक्कलकोट देवस्थानचा विकास यासाठी आमदार म्हेत्रे यांचे मोठे योगदान आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे दिग्गज आणि जिल्ह्याच्या राजकारणातील किंगमेकर नेते म्हणून अक्कलकोट आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची ओळख आहे. 1997 च्या पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर म्हेत्रे यांचा महाराष्ट्र विधानसभेत पहिल्यांदा प्रवेश झाला. 2009 चा अपवाद वगळता म्हेत्रे यांच्याकडे आमदारकी कायम राहिली आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष, गृह राज्यमंत्री म्हणूनही आमदार म्हेत्रे यांनी काम पाहिले आहे. अक्कलकोट तालुक्‍यातील कुरनूर धरण, तालुक्‍यातील साखर कारखाने, अक्कलकोट देवस्थानचा विकास यासाठी आमदार म्हेत्रे यांचे मोठे योगदान आहे. कॉंग्रेसमध्ये असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या स्नेहपूर्ण संबंधातून आमदार म्हेत्रे यांनी अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्‍यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या एकरूख उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावत आणला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख