नियमित योगा, मैदानी खेळामुळे कधी थकवा जाणवत नाही  -आमदार मेघना बोर्डीकर

जिंतूर - सेलूच्या आमदार मेघना बोर्डीकरसकाळी ७ ते रात्री ११ पर्यत मतदार संघातील समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात. त्यांना एवढी ऊर्जा कशी मिळते, त्यांच्या फिटनेस फंडा काय? हे 'सरकारनामा'ने जाणून घेतले
MLA Meghana Bordikar Fitness Funda
MLA Meghana Bordikar Fitness Funda

परभणी : राजकीय नेत्यांचा सर्वात जास्त वेळ मतदार संघातील समस्या सोडविण्यात जातो. घरातील कामे तर सोडाच परंतू स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्यास ही अनेकांना वेळ मिळतोच असे नाही. परंतु,अशा धावपळीच्या जीवनातही अनेक राजकीय नेते स्वतःला फिट ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करत असतात.

जिंतूर - सेलूच्या आमदार मेघना बोर्डीकर देखील यात मागे नाहीत. कदाचित यामुळेच आमदार बोर्डीकर सकाळी ७ ते रात्री ११ पर्यत मतदार संघातील समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात. त्यांना एवढी ऊर्जा कशी मिळते, त्यांच्या फिटनेस फंडा काय? हे 'सरकारनामा'ने जाणून घेतले.
 
मेघना बोर्डीकर म्हणाल्या, ''दररोज नियमित योगा व मैदानी खेळ यामुळे मी फिट असते. थकवा जाणवत नाही; दररोजच्या सुख दुःखाला धैर्याने सामोरे जाण्यासाठी मला यातून बळ मिळते.  घरातील सर्व सदस्यांना व्यायामाची सवय पहिल्यापासूनच आहे. त्यामुळे घरातच अद्ययावत जीम थाटण्यात आले आहे. जीम, योगा सोबतच  टेबल टेनिस ,बास्केट बाॅल हे मैदानी खेळ देखील महत्वाचे ठरतात.''

त्या पुढे म्हणाल्या, "सासरे कृष्णाजी साकोरे हे  भारतीय नौदलातील सेवानिवृत्त लेफ्टनंट असल्याने त्यांचा नियमित व्यायामाची सवय आणि महत्व आम्हा सर्वांना समजले. वयाच्या ८४ व्या वर्षी ते तरुणालही लाजवतील इतके फिट आहेत.  नौदलात एक उत्तम खेळाळू म्हणुन त्यांची ओळख होती. शिवाय बॉक्सींग व वेट लिफटींगमध्ये ही ते पारंगत आहेत. त्यामुळे फिटनेसचे महत्व किंवा वारसा म्हणा आम्हालाही मिळाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.''

''घरात आधीपासून व्यायामाचे सर्व साहित्य उपलब्ध असल्यामुळे दिवसाची सुरुवातच जीम आणि व्यायामाने होते. आहे. सकाळी नियमित १ तास योगासने हा गेल्या अनेक वर्षाचा शिरस्ता कायम आहे. पुणे असो कि जिंतूर यात खंड पडू देत नाही.  पहाटे योगासने पूर्ण केल्या शिवाय घराबाहेर पडायचे नाही हा नियमच केला आहे. दिवसभर मतदार संघात कामासाठी घराबाहेर रहावे लागते. कोरोना विषाणु संसर्गाच्या दिवसात तर प्रत्येक गावांना भेटी द्याव्या लागत आहेत. लोकांचे मनोबल वाढविण्याचे काम देखील करावे लागत आहे. अशावेळी पहाटे केलेली योगासन, जिममधील व्यायामाचे विविध प्रकार कामी येतात,'' असेही त्यांनी सांगितले. 

संतुलित आहार तितकाच महत्वाचा

योगा, व्यायाम आणि मैदानी खेळामधून दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळत असली तरी संतुलित आहार,  भाजीपाला व ताजी फळे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. यातून शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत असतात. त्यावर देखील माझा भर असतो असेही मेघना बोर्डीकर सांगतात.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com