MLA Mahesh Landge targets health department | Sarkarnama

आमदार महेश लांडगेंनी केले डॉ.दीपक सावंत यांना लक्ष्य

उत्तम कुटे
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पिंपरीःसाथीच्या रोगाच्या वाढत्या प्रार्दूभावावर व्यवस्थापन समिती स्थापन करण्याच्या तीन वर्षापूर्वी दिलेले आश्‍वासन सरकारनेच पाळले नसल्याचा घरचा आहेर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.

याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी ताराकिंत प्रश्‍नाव्दारे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली आहे. याव्दारे त्यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री शिवसेनेचे डॉ.दीपक सावंत यांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे.

सोमवारपासून मुंबई येथे सुरू झालेल्या या अधिवेशनात लांडगे यांनी पाच ताराकिंत प्रश्‍न आणि एक लक्षवेधी दिली आहे. त्यात भोसरीच नव्हे,तर पिंपरी-चिंचवडसह राज्याला भेडसावणाऱ्या व वेगाने पसरलेल्या स्वाईन फ्लू, डेंगी व मलेरिया या साथीच्या रोगांचा प्रश्‍न उपस्थित केला आहे. 

राज्यात व त्यातही पिंपरी-चिंचवडसह पुण्यात 2010 पासून स्वाईन फ्लूच्या जोडीने नंतर डेंगी व मलेरियाने डोके वर काढले. त्यातही "स्वाईन फ्लू'ने यावर्षी पहिल्या नऊ महिन्यात 197 बळी गेले आहेत. तसेच दूषित पाण्यामुळे डेंगी आणि मलेरियाचे रुग्णही वाढत असल्याकडे लांडगे यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.ते वेधताना त्यांनी साथीच्या वाढत्या आजारावर साथीच्या रोगावरील व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचे आरोग्यमंत्र्यांनी तीन वर्षापूर्वी दिलेले आश्‍वासन पाळले नसल्याकडेही अंगुलिनिर्देश केला आहे.त्यामुळे ही समिती का स्थापन झाली नाही, त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. तसेच या आजारांवर काय उपाय योजले आहेत,त्याचा तपशीलही मागितला आहे.

पाणीपुरवठा करणारे पवना धरण भरूनही अनियमित पाणीपुरवठा होत असल्याबद्दल त्यांनी भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. पालिकेचा पाणीपुरवठा विभाग निष्क्रिय ठरला असून पाणीटंचाईला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर पालिका आयुक्तांनी कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी दुसऱ्या ताराकिंत प्रश्‍नाव्दारे केली आहे. हा प्रश्‍न पटलावर आला,तर तो पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवर शेकण्याची शक्‍यता आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख